Eco friendly bappa Competition
घर पालघर पाकिस्तानच्या कैदेतून पाच खलाशांची सुटका

पाकिस्तानच्या कैदेतून पाच खलाशांची सुटका

Subscribe

विलास कोंडारी तलासरी तालुक्यातील घेवरपाडाचे रहिवाशी आहेत. जितेश पाचलकर आणि जयंत पाचलकर पितापुत्र असून ते तलासरी तालुक्यातील पाटील पाड्यातील आहेत. जितेश दिवा डहाणू तालुक्यातील जांबुगाव तर अर्जून डावरे डहाणू तालुक्यातील सरावली गावचे रहिवाशी आहे.

वसई : ४ डिसेंबर २०१९ रोजी मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या पालघर जिल्ह्यातील पाच खलाशांना पाकिस्तानच्या सिक्युरिटी जवानांनी अटक केली होती. त्यांच्या सुटकेसाठी अनेकांनी केलेल्या प्रयत्नांना फळ येऊन अखेर पाचही खलाशी आपापल्या घरी सुखरुपपणे परतले आहेत. विलास कोंढारी, जितेश पाचलकर, जयंत पाचलकर, जितेश दिवा आणि अर्जून डावरे अशी सुटका झालेल्या खलाशांची नावे आहेत. विलास कोंडारी तलासरी तालुक्यातील घेवरपाडाचे रहिवाशी आहेत. जितेश पाचलकर आणि जयंत पाचलकर पितापुत्र असून ते तलासरी तालुक्यातील पाटील पाड्यातील आहेत. जितेश दिवा डहाणू तालुक्यातील जांबुगाव तर अर्जून डावरे डहाणू तालुक्यातील सरावली गावचे रहिवाशी आहे.

हे पाचही खलाशी उदरनिर्वाहासाठी मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करतात. ४ डिसेंबर २०१९ रोजी त्यांची बोट मासेमारी करत असताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेली. पाकिस्तानच्या सैनिकांनी लगेचच सर्वांना ताब्यात घेतले. तेव्हापासून पाचही खलाशी पाकिस्तानच्या तुरुंगात होते. याआदिवासी मच्छिमारांच्या सुटकेसाठी खासदार राजेंद्र गावीत यांनी संसदेत आवाज उठवला होता. तर आमदार सुनिल भुसारा यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. अखेर पाकिस्तानच्या कैदेतून पाचही जणांची सुटका झाली. पाकिस्तान सैनिकांनी त्यांना वाघा बॉर्डरपर्यंत सोडले. त्यानंतर पाचही जणांच्या कागदपत्रांची पडताळणी वेरावल येते करण्यात आली. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर रस्तेमार्गे त्यांना आपापल्या घरी पोचवण्यात आले. साडेतीन वर्षांनी परतलेल्या खलाशांच्या कुटुंबात त्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील आणखी काही खलाशी पाकिस्तानच्या कैदेत असून त्यांच्याही सुटकेचे प्रयत्न सुरु असल्याने तेही लवकरच आपल्या घरी सुखरुप येण्याची वाट कुटुंबीय पहात आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -