पालघरमध्ये प्रथमच होणार कोमसाप राज्य स्तरीय महिला साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात कोमसापच्या वतीने प्रथमच पालघर जिल्ह्यात ६ व्या राज्य स्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन ११ व १२ जून रोजी पालघर शहरातील सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी संचालित महाविद्यालयातील नाट्यगृहात संपन्न होणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात कोमसापच्या वतीने प्रथमच पालघर जिल्ह्यात ६ व्या राज्य स्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन ११ व १२ जून रोजी पालघर शहरातील सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी संचालित महाविद्यालयातील नाट्यगृहात संपन्न होणार आहे. मंगळवारी पालघर येथील दांडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या एका पत्रकार परिषदेत कोमसापच्या केंद्रीय नियामक मंडळाचे सदस्य व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी या संमेलनाबाबत माहिती दिली. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील महिला साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दोन दिवसीय साहित्य संमेलनात विविध साहित्यिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील परिसंवाद, काव्य संमेलने, गझल संमेलने, अभिवाचन, कथाकथन आदी सत्रांमध्ये नवोदित साहित्यिक आपल्या प्रतिभेचा आविष्कार सादर करतील. यादरम्यान, साहित्य संमेलनातील विविध सत्रे सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील नाट्यगृह आणि मोकळ्या प्रांगणात पार पडतील. संमेलनासाठी साहित्य नगरीचे नाव शांताबाई शेळके यांच्या नावावर, सभागृहाचे नाव अनुताई वाघ यांच्या नावावर, व्यासपीठाचे नाव स्व. मालती राऊत यांच्या नावावर, ग्रंथ दालन स्व. शिरीष पै यांच्या नावावर तर कलादालन स्व. लता मंगेशकर यांच्या नावावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती ज्योती ठाकरे यांनी दिली. या संमेलनाला यशस्वी करण्यासाठी कोमसापच्या पालघर जिल्हा पदाधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील ८ ही तालुक्यातून १ हजार महिलांची उपस्थितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच यावेळी कोमसापच्या इतर पदाधिकार्‍यांकडून संमेलन अध्यक्ष म्हणून ज्योती ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

हेही वाचा – 

मोठी बातमी! मेधा सोमय्यांचा संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा