घरपालघरचांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

Subscribe

त्यानंतर दर महिन्याला ८ हजार रुपये परत दिले. ती वेळेत पैसे पाठवत असल्याने तिने जगदीश त्यांची पत्नी व आईचा विश्वास संपादन करुन घेतला होता.

भाईंदर :- मीरारोड येथील कनकीया परिसरात राहणारे जगदीश शाहरी यांना व त्यांच्या पत्नीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून ७१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरारोड येथील कनकीया परिसरात राहणारे जगदीश शाहरी यांच्या पत्नी दिव्या शाहरी या विलेपार्ले येथे कामाला असून त्या रेल्वेने प्रवास करतात. प्रवासा दरम्यान त्यांची ओळख डिम्पल गुप्ता हिच्याशी झाली होती. ते नियमित एकत्र प्रवास करत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. प्रवासादरम्यान डिम्पल गुप्ता हिने दिव्या हिला सांगितले की, तिची मैत्रिण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करते व त्याचे तिला चांगले नफा मिळतो. त्यावेळी दिव्या हिने त्याकडे दुर्लक्ष केले. २०१३ मध्ये डिम्पल ही दिव्या यांच्या घरी आली त्यावेळी तिने दिव्या यांच्या सासूला १ लाख रुपये गुंतवणूक केल्यास ८ हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील असे सांगितले. त्यावेळी त्यांनी १ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगून डिम्पलच्या बँक खात्यामध्ये पैसे दिले. त्यानंतर दर महिन्याला ८ हजार रुपये परत दिले. ती वेळेत पैसे पाठवत असल्याने तिने जगदीश त्यांची पत्नी व आईचा विश्वास संपादन करुन घेतला होता.

त्यानंतर २०१५ मध्ये डिम्पलने पाच लाख रुपये गुंतवणूक केल्यास सहा महिन्यानंतर ८ लाख रुपये मिळतील असे सांगितले. त्यांनी ५ लाखाची गुंतवणूक केली. सहा महिन्याने डिम्पल हिने ८ लाख रुपये परत केले. त्यावेळी डिम्पलला गुंतवणूक करणार्‍या तिच्या मैत्रिणीबाबत विचारले असता तिने तिच्या मैत्रिणीचे नाव शर्मिला अडसुळे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा गुंतवणूक केली त्यावेळी देखील परतावा परत केला. जगदीश व त्याच्या आईला डिम्पल गुप्ता व शमिर्ला अडसुळे यांचेकडुन गुंतविलेल्या रक्कमेचा वेळेवर परतावा मिळत असल्याने त्यांचा त्या दोघींवर विश्वास बसला होता. त्यामुळे जगदीश व त्यांच्या पत्नी व आईने मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी बँक ट्रान्सफर व रोख रक्कम स्वरुपात डिम्पल गुप्ता व शर्मिला अडसुळे यांचे बँक खात्यावर ७१ लाख रुपये जमा केली आहे. त्या दोघींनी जगदीश व त्यांच्या आईचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या दोघींना विश्वासाने ७१ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले. परंतु डिम्पल गुप्ता व शर्मिला अडसुळे यांनी आपसांत संगणमत करून गुंतवणूक केलेली रक्कम परत दिली नाही. त्यांनी दिलेल्या रक्कमेचा अपहार केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -