घरपालघरज्येष्ठ नागरिकांना मोफत लस

ज्येष्ठ नागरिकांना मोफत लस

Subscribe

शहरात दोन ठिकाणी कोविड सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे काम सुरू

सोमवारपासून मीरा भाईंदरमधील ज्येष्ठ नागरिकांना कोविडची लस मोफत देण्यात आहे. शहरात दोन ठिकाणी कोविड सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.कोविड 2 किंवा आरोग्य सेतू पोर्टलवरून किंवा अॅप डाउनलोड करून लसीकरणासाठी स्वतः नोंदणी करता येणार आहे. एका मोबाइल क्रमांकावरून चार लाभार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. ओटीपी व्हेरिफिकेशन नंतर लाभार्थ्याचे कोविड अकाउंट उघडण्यात येणार असून, त्यावर नाव, जन्माचे वर्ष, लिंग आदी तपशील भरावा लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान जवळचे सरकारी किंवा खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्र, तारीख व वेळ निवडता येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी स्लिपची प्रिंट काढता येणार आहे तसेच लाभार्थ्यांच्या मोबाइलवर मेसेज देण्यात येणार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरण सुरू केले होते. त्यानंतरच्या आताच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस मोफत देणे सुरू आहे. कोविड लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांसर इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जात होती. यामध्ये पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पालिका कर्मचारी, महसूल कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना सोबतच लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. मीरा भाईंदर महापालिका पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (टेंम्बा हॉस्पिटल) व स्वर्गीय प्रमोद महाजन कोविड सेंटर येथे ज्येष्ठ नागरिकांना मोफत लस देणार
आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -