Eco friendly bappa Competition
घर पालघर महागाईत गरीब निराधार,बुडत्याला काडीचा आधार

महागाईत गरीब निराधार,बुडत्याला काडीचा आधार

Subscribe

मात्र या दिवसांत सर्व संकटांवर मात करुन सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यावसाय तंगीत सापडलेल्या मजुरांना मोठा आधार आहे.

खोडाळा : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गवत विक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे. त्यामुळे बुडत्याला गवताच्या काडीचा आधार म्हणतात ते त्यांच्या बाबतीत खरे ठरले आहे. जव्हार, मोखाडा तालुक्यातील खेडोपाडी गणपती सणानंतर गवत खरेदी विक्रीचा व्यावसाय तेजीत चालू झाला आहे. रोजगारासाठी कोणतीही सोय नसल्याने या भागातील मजुरांना वणवण भटकावे लागते. रोजगाराअभावी कधी कधी मोठा प्रमाणात स्थलांतराचा पर्याय अनेकांना निवडावा लागतो. त्यातून आदिवासींची वेठबिगारीला जन्म होतो. सर्वत्र ठिकाणी शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या हाताला कोठेच काम मिळेनासे होत, असल्यामुळे पावसाळ्यात निर्माण झालेले गवत नागरिकांना रोजगार मिळून देत आहे. ग्रामीण भागात शेतजमीन शिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करीत असल्याचे चित्र सध्या मोखाडा तालुक्याच्या खोडाळा परिसरात पहावयास मिळत आहे.पावसाळ्यात खेडोपाडी रोजगाराचा आधार आसलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे पूर्णपणे बंद राहतात. या पावसाळ्यात चार महिन्यात माळरानांवर, जंगलात नैसर्गिक उगवणारे गवत विकून काही अंशी मजुरांना थोडा फार रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. भाद्रपद महिना म्हणजे ग्रामीण भागात हालाखीचा दिवस असल्याने व या महिन्यात गौरी गणपती व नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. मात्र या दिवसांत सर्व संकटांवर मात करुन सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यावसाय तंगीत सापडलेल्या मजुरांना मोठा आधार आहे.

या व्यवसायात गवताच्या लहान ४ जुड्यांची १ धडी व प्रत्येक धडीला ५ ते ६ रुपये गवत कापणार्‍यास तर जागा मालकास ६ रूपये मिळतात. मजुरांना या गवत कापणीचे दिवसभरातून १२० ते १५० रूपये मिळतात. तर जागा असलेल्या मालकाला क्विन्टल मागे केवल ९० ते १०० रुपये मिळतात तर तेच व्यापार्‍यांना विक्री केल्यावर क्विंटल मागे अंदाजे ५०० ते ७०० रूपये मिळतात. बहुतांशी हे गवत नाशिक- मुंबई- ठाण्यातील तबेलेवाल्यांना पुरवले जाते.
सध्याचा काळात गवताने भरलेले ट्रकच्या ट्रक नाशिक- मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाताना पहावयास मिळत आहेत. खरेदी केलेल्या गवताला मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, बोरीवली, भिवंडी, आणि गुजरातमधे तबेल्यांमध्ये मोठी मागणी असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत आहे. सणाच्या दिवसात औषोधोपचार व आठवडा बाजारासाठी, मुलांचा शिक्षणासाठी गवत विक्रीचा व्यावसाय मजुरांना आधार बनला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -