घरपालघरभाजपची सत्तेत भागीदारी; माकपसोबत खुलेआम घरोबा

भाजपची सत्तेत भागीदारी; माकपसोबत खुलेआम घरोबा

Subscribe

तलासरी नगरपंचायतीत भाजपने माकपच्या साथीने सत्तेत वाटा घेत घरोबा केल्याने अनेकांच्या भूवय्या उंचावल्या आहेत.

तलासरी नगरपंचायतीत भाजपने माकपच्या साथीने सत्तेत वाटा घेत घरोबा केल्याने अनेकांच्या भूवय्या उंचावल्या आहेत. तलासरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झालेली आहे. गेल्यावेळी एकहाती सत्ता मिळवलेल्या माकपला अवघ्या सहाच जागांवर समाधान मानावे लागले होते. त्या खालोखाल माकपचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपने सहा जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला तीन तर जिजाऊला दोन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे नक्की सत्ता कोण स्थापन करणार याची उत्सुकता लागून राहिली होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने थेट माकपलाच मतदान करून शिवेसना-जिजाऊ युतीला सत्तेपासून दूर ठेवले होते.

माकपची सत्ता आल्यानंतर भाजप विविध विषय समित्या आपल्याकडे घेत थेट सत्तेत वाटेकरी झाला आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी भाजपच्या वनिता मासमार यांची निवड झाली आहे. तसेच पाणीपुरवठा आणि जलःनिस्सारण समितीच्या सभापती भाजपचेच सचिन शनवार निवडून आले आहेत. मागासवर्गीय कल्याण, नियोजन आणि करवसुली समिती सभापतीपदी माकपचे सुभाष दुमाडा, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी माकपच्या शांती मालावकर व स्थायी समिती सभापतीपदी माकपचे सुरेश भोये यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, माकप आणि भाजप यांच्यात पालघर जिल्ह्यात पारंपारिक राजकीय वैर आहे. या दोन्ही पक्षांमध्ये अनेक हाणामाऱ्याही झाल्या आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत माकपने भाजपचा पराभव केला होता. जिल्ह्यातील दोन राजकीय वैरी एकत्र आल्याने राजकीय ध्रुवीकरणाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते.

(कुणाल लाडे हे डहाणूचे वार्ताहर आहेत.)

- Advertisement -

हेही वाचा –

Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना मोठा धक्का, ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -