घरदेश-विदेशUP Election 2022 Live Update : उत्तर प्रदेशमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५३.३१...

UP Election 2022 Live Update : उत्तर प्रदेशमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५३.३१ टक्के मतदान पार पडले

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५३.३१ टक्के मतदान पार पडले.


उत्तर प्रदेशातील 10 जिल्ह्यांमध्ये  दुपारी 1 वाजेपर्यंत 36.33 टक्के मतदान

- Advertisement -


उत्तर प्रदेशातील 10 जिल्ह्यांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 21.79 टक्के मतदान

- Advertisement -

उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 21.79 टक्के मतदान


नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावला.


उत्तरप्रदेशात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.69 टक्के मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या सहाव्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 8.69 टक्के मतदान झाले. सर्वाधिक वस्ती असलेल्या जिल्ह्यात 9.88 टक्के मतदान झाले.


केंद्रीय मंत्र्याने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह पत्नी भाग्यश्री चौधरी, मुलगा रोहन चौधरी आणि मुलगी श्रुती चौधरी यांनी महाराजगंजमध्ये मतदान केले. धानेवा धानेई पूर्व येथील बूथ क्रमांक 204 वर त्यांनी कुटुंबासह मतदान केले.


कुशीनगरच्या तामकुही राजच्या पिपराघाटमध्ये पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. बूथ क्रमांक 320, 321 आणि 323 वर मतदान सुरू झालेले नाही. स्थानिक लोक डीएमला घटनास्थळी बोलावण्यावर ठाम आहेत. इतर उच्चपदस्थ अधिकारी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 


उत्तर प्रदेश निवडणुक मतदानादरम्यान बलियामधील भाजप उमेदवार दयाशंकर सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला


उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये मतदानाला सुरुवात


युपीमध्ये आज सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले मतदान


10 जिल्ह्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान; गोरखपूरसह हायहोल्टेज मतदारसंघांकडे लक्ष

दोन कोटी 14 लाखांहून अधिक मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. मतदानाला सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग सुरु राहिल. एकूण 276 उमेदवार सहाव्या टप्प्यात निवडणुकीच्या रणांगणात आहेत.


युपीमध्ये आज सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून 10 जिल्ह्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान होत आहे. युपीमध्ये  सहाव्या टप्प्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांचे सात मंत्री, विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी आणि बसपा विधिमंडळ पक्षाचे नेते उमाशंकर सिंह आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात 2.15 कोटी मतदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 676 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. त्यापैकी 66 महिला उमेदवार आहेत. 2017 मध्ये 57 जागांपैकी 46 जागा भाजपच्या ताब्यात होत्या.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -