घरपालघरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

Subscribe

बाकी आमच्यावर काय कोणाला आरोप करायचे ते करू द्या, आमचे काम त्यांना उत्तर देईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले.

भाईंदर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाषण करताना शिंदे -भाजप सरकार हे जनतेचे सरकार असून विरोधकांना कामातूनच उत्तर देऊ असे म्हणत त्यांनी केलेल्या काही कामाची माहिती दिली. त्यावेळी मीरा- भाईंदर शहरासाठीचा मुख्यत्व मुद्दा असलेल्या पिण्याच्या पाण्यासंबंधी बोलताना सूर्या धरणातून पुढच्या वर्षी मीरा भाईंदर शहराला ४१८ एमएलडी पाणी पुरवण्यासाठी ५१६ कोटी रुपये अंतर्गत जलवाहिनी अंथरण्यासाठी मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे दहिसर सी-लिंक ते मिरारोड व भाईंदर पश्चिमपर्यंत १८०० कोटी खर्च करून उड्डाणपूल होणार आहे, त्यामुळे बर्‍याच प्रमाणात वाहतूक कोंडीची फोडी होणार आहे. तसेच आम्ही मंत्रालयातच काम करत नाही तर वाटेल, जिथे भेटेल तिथे काम करतो. पेन तर आमच्या खिशालाच असते. बाकी आमच्यावर काय कोणाला आरोप करायचे ते करू द्या, आमचे काम त्यांना उत्तर देईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले.

यावेळी आमदार गीता जैन यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांच्या समोरच दहिसर टोल नाक्याचे दुःख मांडले. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणात म्हटले की,गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृहाची इमारत ही महापालिकेला एकही रुपया न-खर्च करता कन्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून मिळाली आहे. तसेच अंतर्गत सजावटीसाठी येणारा ५० कोटींचा खर्च तो सुद्धा टीडीआरच्या माध्यमातून दिला आहे. तर नवीन युडीपीसीआरच्या माध्यमातून हा खर्च विकासकांनी केला आहे, म्हणून महापालिकेला कुठेही आर्थिक खर्च न-होता मोफत मिळाले आहे, ही संकल्पना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यात केलेल्या धर्तीवर मिळाली आहे. त्यासोबतच आमदार गीता जैन यांच्यासमोर निवडणुकीत उभ्या राहिलेल्या व जनतेने घरी बसविलेल्या निरुपद्रवी लोकांनी एवढी सुंदर वास्तू असताना त्याबद्दल विकासक व जनतेने निवडून दिलेल्या आमदार यांच्यावर नाट्यगृहात घोटाळा केला म्हणून आरोप केले आहेत. अशांना आमचे कामच उत्तर देईल,असे सरनाईक यांनी असे ठणकावून सांगितले.

- Advertisement -

सदर कार्यक्रमाच्या वेळी आदिवासी विकास आढावा समिती मंत्री विवेक पंडीत,खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, पराग शाह, पोलीस आयुक्त सदानंद दाते, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव बालाजी खतगांवकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर निर्मला सावळे, भाजप जिल्हाध्यक्ष रवी व्यास, माजी नगरसेविका परिशा सरनाईक, वास्तू विशारद मुग्धा पतकी, रुग्णालय विकासक अतुल शहा, प्रशासकीय भवन विकासक विजय जैन, हाफीज कॉन्ट्रॅक्टर नाट्यगृह वास्तु विशारद, हितेन सिटी व महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यांनी वेळात वेळ काढून सर्व लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मानोरकर, उपायुक् संजय शिंदे, रवी पवार, मारुती गायकवाड, सहायक संचालक नगररचना हेमंत ठाकूर, शहर अभियंता दिपक खांबीत, नगररचनाकार केशव शिंदे व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

असा पार पडला लोकार्पणाचा कार्यक्रम
मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वात प्रथम मिरा रोड पूर्व महाजन वाडी येथील लोढा अमेनिटी स्केटिंग रिंग लोकार्पण, त्यानंतर मिरा रोड पूर्व आरक्षण क्रमांक ३०२ येथील हॉस्पिटल बांधण्याच्या कामाचे व मिरा रोड पूर्व घोडबंदर येथे नवीन महानगरपालिका प्रशासकीय भवन भूमिपूजन, मिरा रोड पूर्व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह फलकाचे अनावरण केले. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदर महानगरपालिकेने मागील वर्षभरात केलेल्या विकासकामांची चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते भाईंदर पश्चिम येथील चिमाजी अप्पा व भाईंदर पूर्व येथील महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ई-अनावरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

- Advertisement -

काशीमिरा परिसरातील गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी सदरील कार्यक्रमास भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना निमंत्रण असूनही त्यांच्यासोबत असलेल्या ताफ्याला सुरक्षेचे कारण देत आत जाऊ न-देता पोलिसांनी गेटवरच थांबवल्याने भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणा देत कार्यक्रम पत्रिका फाडून निषेध नोंदविला.मेहता यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार्‍या उद्घाटन व भूमिपूजनावर दोन दिवस अगोदरच पत्रकार परिषद घेत आरक्षण क्रं.३०२ व महापालिका मुख्यालय घोडबंदर येथे घोटाळ्याचे भूमिपूजन होत असल्याचे सांगून आपण फक्त नाट्यगृहाच्या लोकार्पनाला जाणार आहोत असे सांगत एकप्रकारे बहिष्कार टाकला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -