घरपालघरवाड्यातही लम्पी त्वचारोगाचा शिरकाव ?

वाड्यातही लम्पी त्वचारोगाचा शिरकाव ?

Subscribe

सध्या पावसाळा असल्याने हिरवा चारा जनावरांना मिळत असल्याने दुधाचे प्रमाणही वाढते असे असतानाच लम्पी त्वचा रोगाचा संशयित जनावर आढळून आल्याने शेतकरी भयभित झाले आहेत.

वाडा: पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्यात लम्पी त्वचारोगाची लागण असंख्य जनावरांना झाली असतानाच त्याचा शिरकाव वाडा तालुक्यातही झाला असल्याचे दिसून येते आहे. दिनकर पाडा या गावातील शेतकरी वैभव चौधरी यांच्या जनावरांनाही लंम्पी त्वचारोगाची लक्षणे असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतक-यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करीत असतात.दुग्धव्यवसायासाठी हजारो रूपये खर्च करून म्हैशी व गाई येथील शेतकरी खरेदी करतात.तसेच शेती कामासाठी पशुधनाचा वापर केला जातो.त्यामुळे तालुक्यात जनावरांची संख्या ब-यापैकी आहे.सध्या पावसाळा असल्याने हिरवा चारा जनावरांना मिळत असल्याने दुधाचे प्रमाणही वाढते असे असतानाच लम्पी त्वचा रोगाचा संशयित जनावर आढळून आल्याने शेतकरी भयभित झाले आहेत.

दिनकर पाडा येथील शेतकरी वैभव चौधरी यांचा दुग्धव्यवसाय हा जोडधंदा असून त्यांच्याकडे अनेक जनावरे आहेत. त्यातील एका गाईच्या अंगावर गाठी येणे,खाणे कमी होणे,पायाला सुज येणे अशी लक्षणे दिसून आली असल्याने त्यांनी तत्काळ कुडूसचे पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ. शरद अस्वले यांच्याशी संपर्क साधला असता डाॅक्टर तत्काळ घटनास्थळी पोहचून त्यांनी संशयित गाईची तपासणी करण्यात आली.त्यानंतर गाईच्या रक्ताचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले असून ते भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती डाॅ. अस्वले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच लम्पी रोग आहे की इतर कोणता आजार याची माहिती मिळू शकेल असे डाॅक्टरांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -