घरपालघरकातकरी समाजाला स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक

कातकरी समाजाला स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक

Subscribe

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकविकास मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भूर्ंकुड यांनी सूत्रसंचालन संतोष साठे यांनी तर आभारप्रदर्शन कातकरी समन्वय समितीचे रमेश सावरा यांनी केले. या मेळाव्यासाठी पालघर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यातून कातकरी बांधव सहभागी झाले होते.

वाडा / जव्हार: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरूवारी पालघर दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील काही कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली.कातकरी समन्वय समिती व लोकविकास मंडळ यांच्यावतीने गुरुवारी वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानात कातकरी समाजाच्या सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी कातकरी समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक असून त्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच समाजातील प्रत्येक घटकाने कार्यरत राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कातकरी हा आदिम समाज रोजगारासाठी नेहमी स्थलांतरित होत असल्याने या समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे कातकरी समाजाला स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक असून त्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वाडा येथे बोलताना केले आहे. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकविकास मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भूर्ंकुड यांनी सूत्रसंचालन संतोष साठे यांनी तर आभारप्रदर्शन कातकरी समन्वय समितीचे रमेश सावरा यांनी केले. या मेळाव्यासाठी पालघर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यातून कातकरी बांधव सहभागी झाले होते.

दुसरीकडे जव्हार येथे कोश्यारी यांच्या हस्ते प्रगती प्रतिष्ठानचे संस्थापक स्व.वसंतराव पटवर्धन यांंच्या अर्धपुतळ्याचे अनावरण सकाळी ११ वाजता जव्हार शहरातील मूकबधिर शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात कार्य करणारी प्रगती प्रतिष्ठान संस्था या वर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत यावेळी व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सुनंदा ताई पटवर्धन आणि संस्थेचे पदाधिकारी हे देखील उपस्थित होते.

- Advertisement -

 

लोकप्रतिनिधींचा रूसवा

- Advertisement -

जव्हारमधील प्रगती प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या राज्यपाल यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रोटोकॉल टाळून स्थानिक आमदारांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी केला आहे .या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या स्थानिक आमदार सुनील भुसारा , आमदार श्रीनिवास वनगा , जिल्हाधिकारी गोविंद बोडके , पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना प्रेक्षकांच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या रांगेत बसवल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप आमदार भुसारा व पालघरचेेे आमदार श्रीनिवास वनगा यांनी केला आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -