घरपालघरकिरण गोसावीला ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

किरण गोसावीला ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

आर्यन खान प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी यांने पालघरमधील एडवण येथील दोन तरुणांची परदेशात नोकरी देतो, असे सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक केली होती.

आर्यन खान प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी यांने पालघरमधील एडवण येथील दोन तरुणांची परदेशात नोकरी देतो, असे सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी केळवे पोलिसांनी गोसावीला पुणे येथून ताब्यात घेतले असून गोसावीला गुरुवारी पालघर दिवाणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी गोसावी याला ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांची त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केली होती. या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये गोसावी याने उकळले होते. उत्कर्ष व आदर्श हे दोन तरुण दोन-तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना किरण गोसावी याची त्यांच्याशी सुरुवातीला फेसबुकवरून मैत्री झाली.

उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो, असे सांगितल्यानंतर दोघांकडून गोसावी याने १ लाख ६५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार दोघांनीही गोसावी याच्या के. पी. इंटरप्राईज या बँक खात्यात पैसे दिले होते. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व विजा दिला. कोचिन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट बोगस असल्याचे समजताच दोघांनाही धक्का बसला. तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्य न दाखविल्याने त्या दोन्ही तरुणांचा तक्रारी अर्ज केळवे पोलीस ठाण्यात धूळखात पडून होता.

- Advertisement -

आर्यन खान प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनविल्यानंतर वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातम्यादरम्यान आर्यन खानसोबत सेल्फी घेत असलेला किरण गोसावी याला उत्कर्ष तरे यांनी पाहिल्यावर आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे, याची खात्री त्यांना पटली. या दोन्ही तरुणांनी केळवे पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक करणार्‍या गोसावीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. किरण गोसावी गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील तरुणांच्या फसवणुकीच्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या ताब्यात होता. एडवण येथील तरुणांच्या फसवणुकीप्रकरणी पालघर पोलिसांनी किरण गोसावीला ताब्यात घेतले. तसेच त्याला पालघर न्यायालयात हजर करण्यात आले असता ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा –

परमबीर सिंहांप्रमाणेच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांवर कारवाईची हिंमत दाखवा, फडणवीसांचा हल्लोबाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -