घरपालघरदोन वर्षानंतर डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेचा उत्सव

दोन वर्षानंतर डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेचा उत्सव

Subscribe

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे खंडीत झालेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या सुप्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेला पुन्हा एकदा उत्साहात सुरुवात झाली.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे खंडीत झालेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या सुप्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेला पुन्हा एकदा उत्साहात सुरुवात झाली. यात्रेनिमित्त मंदीराला रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिर परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षकपणे सजविण्यात आला आहे. चैत्र पौर्णिमेपासून पुढील पंधरा दिवस भरणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविक हजेरी लावत असतात. कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडल्याने प्रथमच होणाऱ्या यात्रेसाठी मंदिर प्रशासनासोबतच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने देखील जय्यत तयारी केली असून राज्य परिवहन विभागामार्फत डहाणू ते महालक्ष्मी दरम्यान नियमीत एसटी बसेस सोडण्यात येत आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विवळवेढे या गावाजवळील गडावर देवीचे मूळ स्थान आणि मंदिर असून ही देवी डहाणूची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे. १६ एप्रिल चैत्र पौर्णिमेपासून देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून पालघर जिल्ह्यातील आदिवासी, कुणबी, आगरी, मांगेला, भंडारी या समाजासोबतच मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक महालक्ष्मी देवीच्या यात्रेला हजेरी लावतात. पंधरा दिवसांच्या यात्राकाळात जवळपास ४ ते ५ लाख भाविक याठिकाणी हजेरी लावत असतात. दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे प्रशासनाकडून यात्रा रद्द करण्यात आल्याने लाखो भाविकांचा हिरमोड झाला होता. यात्रा रद्द झाल्यामुळे पंधरा दिवसात होणारी करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल देखील ठप्प होऊन १ हजारांच्या आसपास असलेले स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि दुकानदार यांचे अतोनात नुकसान झाले होते. महालक्ष्मी यात्रेत विविध प्रकारची हजाराच्या वर दुकाने थाटण्यात येतात.

- Advertisement -

यामध्ये कांदा-बटाटा, मिरची, लसूण, मसाले, शेतीची अवजारे, लहान मुलांसाठी खेळणी, सुकी मासळी, चिकन-मटण भुजिंग, मनोरंजनासाठी विविध आकाश पाळणे, सर्कस, मिठाई, पेढे, प्रसाद, हार-फुलांची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, राहण्याची व्यवस्था, हॉटेल आणि प्रवासी वाहने याद्वारे यात्रा काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यात्रेच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील आदिवासी, कुणबी, आगरी, वाडवळ, भंडारी, मांगेला इत्यादी जातीधर्माचे लोक वर्षभर पुरेल इतक्या जीवनावश्यक सामानाची या यात्रेतून अगदी स्वस्तात बेगमी करतात. सुरुवातीला महालक्ष्मी यात्रोत्सवास जिल्हा प्रशासनाकडून केवळ दोनशे जणांच्या उपस्थितीस आयोजनाची परवानगी मिळाल्याने लाखो भाविकांसह दुकानदारांचा मोठा हिरमोड झाला होता. मात्र नंतर पालघर जिल्हा प्रशासनाने हे निर्बंध हटवल्याने भाविकांसोबतच दुकानदारांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा –

एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून सदावर्ते मालामाल, जमवली कोट्यवधींची संपत्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -