घरपालघरविकास कामांच्या निविदेत सदस्यांना ठेवले अंधारात

विकास कामांच्या निविदेत सदस्यांना ठेवले अंधारात

Subscribe

निविदा प्रसिद्ध न करता सदस्यांना अंधारात ठेवून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे. या अगोदर जाहीर प्रसिद्धी करून रस्त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

वाडा: तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीत विकास कामांची निविदा प्रसिद्ध करताना त्याची ग्रामपंचायत सदस्यांनाही माहिती न देता अंधारात ठेवून निविदा काढण्यात आली असल्याचा आरोप माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य इरफान सुसे यांनी केला असून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे. कुडूस ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीत अलीकडेच विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.या निविदा काढताना विद्यमान सदस्यांना याची माहिती देणे बंधनकारक असताना तसेच कायद्यान्वये सुचवण्यात आलेल्या नियमानुसार निविदा प्रसिद्ध न करता सदस्यांना अंधारात ठेवून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे. या अगोदर जाहीर प्रसिद्धी करून रस्त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यावेळी पाच निविदा धारकांनी निविदा भरल्या होत्या.त्या वेळी 30 टक्के कमी दराने निविदा भरुन ग्रामपंचायतीचा फायदा झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सदस्यांसह ग्रामस्थांना अंधारात ठेवून प्रसिद्ध करण्यात आलेली निविदा ही नियमबाह्य असल्याने याची चौकशी करून ती रद्द करण्यात येवून सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीचे सदस्य इरफान सुसे यांच्यासह छबी तुंबडे, कैलास चौधरी, दिपीका जाधव, परिणीती जाधव, भारती सांबरे या सदस्यांनी केली आहे. कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे. यासंदर्भात कुडूस ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी रोहिणी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता सदरची निविदा नियमानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदस्यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी गटविकास अधिकार्‍यांकडून सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -