घरपालघरमीरा भाईंदर यंदा पाण्याखाली जाणार; सभागृह नेत्यांचा आरोप

मीरा भाईंदर यंदा पाण्याखाली जाणार; सभागृह नेत्यांचा आरोप

Subscribe

मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात पावसाळ्यापुर्वीच्या नालेसफाई कामांना आता सुरूवात झाली असून याकामी तीन कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र या कामाचा कार्यादेश उशिराने जारी झाला असल्याने मीरा-भाईंदर शहर पावसाळ्यात पाण्याखालीच जाणार असल्याची टिका सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी केली आहे.

मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात पावसाळ्यापुर्वीच्या नालेसफाई कामांना आता सुरूवात झाली असून याकामी तीन कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र या कामाचा कार्यादेश उशिराने जारी झाला असल्याने मीरा-भाईंदर शहर पावसाळ्यात पाण्याखालीच जाणार असल्याची टिका सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी केली आहे. मीरा-भाईंदर शहरात लहान मोठे असे एकूण १५५ नाले आहेत. या नालेसफाईचे कंत्राट मे. एम. ई. प्रोजेक्ट लि. यांना देण्यात आले असून याबाबतचे कार्यादेश ७ मे रोजी देण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षात या कामाला १० मे पासून काही मोजक्याच ठिकाणी सुरूवात झाली आहे. मुंबई शहरात पावसाळ्यात हाय अलर्टचे संकेत देण्यात आले असल्याने मुंबईत पावसाचे पाणी साचले जाऊ नये याकरीता समुद्रालगत अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मीरा-भाईंदर शहरदेखील खाडीकिनारी वसलेले असल्याने पावसाळ्यापुर्वीची नालेसफाई व्यवस्थित न झाल्यास हे शहर जलमय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामाकरता नेमण्यात आलेल्या मजूरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. याकरता या मजूरांना सर्व प्रकारची सुरक्षा सामग्री उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदार एम. ई. प्रोजेक्ट कंपनी यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे आढळून येत असल्याने त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही दळवी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली आहे.

- Advertisement -

नालेसफाईच्या कामाकरता ठेकेदाराकडे एकूण किती मजूर कार्यरत असून या कामासाठी फोकलन, जेसीबी, तराफे, टोरस आणि सेवर सकर मशीन इत्यादी साधनसामग्री किती प्रमाणात व कोणकोणत्या ठिकाणी वापरण्यास सुरूवात केलेली आहे. याची जीपीएस लोकेशननुसार आरोग्य निरीक्षकामार्फत दैनंदिन माहिती संकलित करण्यात यावी, अशी मागणीदेखील दळवी यांनी केली आहे.

यावर्षी मान्सून वेळेवर सुरू होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने पावसाळ्यापुर्वी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पूरपरिस्थिती उद्भवून कोरोनाच्या काळात येथील नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सबब या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येऊन त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही दळवी यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

MPSC EXAM 2021: एपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास आयोगाची तयारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -