निवडणुकीच्या तयारीला लागा,आमदार रवींद्र फाटक यांच्या शिवसैनिकांना सूचना

येथील रिजन्सी हॉटेलच्या सभागृहात वसईतील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवार, 16 मार्च रोजी पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार फाटक बोलत होते.

वसई:  आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुका आपल्याला स्वतंत्रपणे लढायच्या आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पालघर जिल्हा संपर्कप्रमुख  तथा आमदार रवींद्र फाटक यांनी केले. नालासोपारा येथील रिजन्सी हॉटेलच्या सभागृहात वसईतील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवार, 16 मार्च रोजी पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार फाटक बोलत होते.
आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुका शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) स्वतंत्रपणे लढणार आहे. या निवडणुका व येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या, त्यांच्या समस्या-अडचणी समजून घेण्याकरता शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच वसईच्या दौऱ्यावर असणार आहेत. हा दौरा व महापालिका निवडणुकांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तसेच या परिसरात शिवसेना वाढवण्यासाठी, घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने प्रयत्न करावेत, अशा सूचना फाटक यांनी या प्रसंगी केल्या.
 पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्याला जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे व अन्य सहकारी उपस्थित होते. या मेळाव्याचे उत्तम नियोजन जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अन्य पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला.