घरपालघरपैशाच्या वादातून नौदल सैनिकाची हत्या?

पैशाच्या वादातून नौदल सैनिकाची हत्या?

Subscribe

शेअर बाजारात पैसे गुंतवल्याने झालेल्या नुकसानीमुळे नौदल सैनिकाने काही मित्रांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. उसने पैशांसाठी मित्र त्याला धमकावत होते

शेअर बाजारात पैसे गुंतवल्याने झालेल्या नुकसानीमुळे नौदल सैनिकाने काही मित्रांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. उसने पैशांसाठी मित्र त्याला धमकावत होते. तसेच गेल्या महिन्यात झालेल्या साखरपुड्यात त्याला सासरच्या लोकांनी ९ लाख रुपये दिले होते. त्यामुळे कर्जात अडकलेल्या नौदल सैनिकाची पैशाच्या वादातून आत्महत्या झाली असावी, असा संशय पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मुळच्या झारखंड राज्यातील रांची येथील रहिवाशी असलेला नौदल सैनिक सूरजकुमार मिथिलेश दुबे (२७) याचे ३० जानेवारी २०२१ ला तीन अज्ञात इसमांनी चेन्नई विमानतळाबाहेर पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले होते. त्यानंतर सूरजकुमारला तीन दिवस चेन्नई येथे डांबून ठेऊन दहा लाखांची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्याने सूरजला एका गाडीत टाकून पालघर जिल्ह्यातील तलासरीजवळील वेवजी गावच्या बैजलपाडा जंगलात नेऊन ५ फेब्रुवारीला त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. त्यात जखमी झालेल्या सूरजचा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता.

- Advertisement -

याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अतिशय संवेदनशील प्रकरणाचा तपास करण्यासाठी दहा पथके तयार केली त्यात दहा अधिकार्‍यांसह शंभर पोलिसांचा समावेश आहे. सूरजकुमार हत्याकांडप्रकरणी पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सूरजकुमार दुबे यांच्याकडे एकूण तीन मोबाईल क्रमांक होते. सूरजकुमार तिसर्‍या मोबाईल क्रमांकाचा वापर फक्त शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी करत असे. शेअर मार्केटमध्ये आस्था ट्रेडिंग आणि एंजल ब्रोकिंग या दोन कंपनीच्या माध्यमातून ट्रेडिंग करण्यासाठी ८ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. यामध्ये त्यांना प्रचंड नुकसान होऊन मुंबईत असलेल्या दोन बँक खात्यातील कर्जाचे लाखो रुपये संपले होते. तसेच आयएनएस अग्रणीवर असलेल्या मित्राकडून त्याने ६ लाख रुपये उसने घेतले होते. हा मित्र उसने दिलेले पैसे परत करण्यासाठी सूरजकुमारला धमकावत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. १५ जानेवारीला साखरपुडा झाल्यानंतर सासरच्यांनी त्याला ९ लाख रुपये दिले होते. आर्थिक वादातून सूरजची हत्या झाल्याची लक्षात घेत विविध माध्यमाद्वारे हत्येचा तपास करून उलगडा केला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा –

लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत – राजेश टोपे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -