Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरपतीची हत्या...मारेकरी सापडला..केला धक्कादायक खुलासा

पतीची हत्या…मारेकरी सापडला..केला धक्कादायक खुलासा

Subscribe

बिहार पोलिसांनी संशयित आरोपी वसई येथील चिंचोटी परिसरात असल्याची माहिती मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालयाला कळवली होती.

वसईः बिहार राज्यातील एका महिलेने पती बेपत्ता झाल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या तपासात तिच्या पतीचा खून झाल्याचे उजेडात आले. त्यानंतर मारेकरी वसईत असल्याचे माहिती बिहार पोलिसांनी कळवल्यानंतर नायगाव पोलिसांनी मारेकर्‍याला ताब्यात घेतल्यावर पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात सुनीलच्या मारेकर्‍याने केलेल्या दुहेरी हत्याकांडाचाही खुलासा झाला आहे. बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातील रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या बारामाण्डेया गावातील सरितादेवी सुनील रंजक हिने पती सुनील रंजक बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तेव्हा गावच्या हद्दीत सहा तुकडे करून हत्या करण्यात आलेल्या पुरुषाचा मृतदेह पोलिसांनी दाखवला असता सरीताने हा आपला पती असल्याचे माहिती दिली होती. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिहार पोलिसांनी संशयित आरोपी वसई येथील चिंचोटी परिसरात असल्याची माहिती मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालयाला कळवली होती.

त्यावरून नायगाव पोलिसांनी दोन पथके तयार करून मारेकर्‍याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता मारेकरी सुजित उर्फ सूरज उमेश सिंग (३१) हा चिंचोटी गावातील पाटीलपाडा येथे हाती लागला. त्याच्या अटकेनंतर सुनील रंजक खूनाचा खळबळजनक खुलासा झाला. सरितादेवी रंजक हिनेच सुजितला आपल्या पतीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. त्यानंतर सुजितने गावातीलच आपला साथिदार रजनीश शर्मा याच्या मदतीने सुनीलची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी सहा तुकडे केले होते. यामाहितीच्या आधारे बिहार पोलिसांनी सरीता रंजक आणि रंजनीश शर्मा यांना अटक केली आहे. तसेच नायगाव पोलिसांनी सुजितला बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.नायगाव पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. सुजित उर्फ सूरज सिंग याने १६ वर्षांपूर्वीचा भांडणाचा राग मनात धरून बिहार राज्यातील बरडकी खारांकला गावचा मुखीया राजकुमार कानू आणि त्याचा मित्र यादव यांचा खून केल्याचेही उजेडात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -