घरपालघरविरारमधील तरुणाच्या अवयवदानाने नऊ जणांना संजीवनी

विरारमधील तरुणाच्या अवयवदानाने नऊ जणांना संजीवनी

Subscribe

दुर्दैवाने मेंदूला जबर दुखापत झाल्याने साकेतचा उपचार सुरु असताना १९ मेला मृत्यू झाला.

वसईः विरारमधील तरुणाचा अपघाती मृत्यूनंतर करण्यात आलेल्या अवयवदानामुळे नऊ जणांच्या आयुष्याला नवी उमेद मिळाली आहे. लग्नानंतर अवघ्या पाचच महिन्यांनी पतीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही पत्नीने सासू-सासर्‍यांच्या मदतीने अवयवदान करुन वेगळा आदर्श दाखवून दिला आहे. विरारमधील नामांकित डॉक्टर दाम्पत्य विनित दंडवते आणि सुमेधा दंडवते यांच्या साकेत (२९) या मोठ्या मुलाचा १९ मेला अपघाती मृत्यू झाला. बेंगळूरु येथील ओके क्रेडीट कंपनीत कामाला असलेला साकेत पुण्याहून बाईकने १५ मेला बेंगळुरुला निघाला होता. महामार्गावर चित्रदुर्ग येथे त्याच्या बाईकला अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या साकेतला बेंगळुरु येथील नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने मेंदूला जबर दुखापत झाल्याने साकेतचा उपचार सुरु असताना १९ मेला मृत्यू झाला.

पाचच महिन्यांपूर्वी साकेतचे नागपूर येथील अपूर्वा विजय कुलकर्णीशी लग्न झाले होते. अवघ्या पाचच महिन्यात कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून स्वतःला सावरत अपूर्वाने साकेतने व्यक्त केलेल्या अवयवदानाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अपूर्वाने सासरे डॉ. विनित दंडवते, सासू डॉ. सुमेधा दंडवते आणि नणंद बालरोगतज्ञ डॉ. अदिती दंडवते यांना सावरत अवयवदानाचा निर्णय अंमलात आणला. साकेतच्या अवयवदानातून तीन जणांना यकृत, दोन जणांना मूत्रपिंड, दोन जणांना डोळे आणि दोन मुलांना हृदयाच्या झडपा व त्वचा मिळून अकरा जणांना जीवनाची नवीन उमेद मिळणार आहे.

- Advertisement -

 

अनेकांना नवी उमेद

- Advertisement -

देशात दरवर्षी अपघातात पाच लाखांहून अधिक लोकांचे जीव जातात. त्यातील अडीच लाख दुचाकीच्या अपघातात मृत्यू पावतात. ७५ टक्के अपघात रात्री अकरा ते पहाटेच्या पाच वाजता असल्याने यावेळेत वाहन चालवणे टाळायला हवे. दारु पिऊन वाहने चालवून नये. तसेच वेगावरही नियंत्रण असले पाहिजे. मृत्यूनंतर अवयवदान केल्याने अनेकांना नवी उमेद मिळते. साकेत अवयवदान करून अमर झाला आहे, असे बालरोगतज्ञ तथा अवयवदान चळवळीतील अग्रणी डॉ. हेमंत जोशी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -