Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर पालघर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Subscribe

नवापूर गावात राहणारे नरेंद्र बारी हे तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अनुह फार्मा तर भूपेश बारी हे जीएम सिंथेटीक या कंपनीत काम करीत होते.

बोईसर : भरधाव वेगातील कारने समोरून येणार्‍या दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळ घडली आहे.या अपघातात दोन तरुणांचा नाहक जीव गेल्याने नवापूर गावावर शोककळा पसरली आहे. अपघातास कारणीभूत कारचालक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. नांदगाव बोईसर रस्त्यावर रविवारी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पाम गावाजवळ एका भरधाव वेगातील कारने समोरून येणार्‍या दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत नरेंद्र बारी (४५) यांचा डोक्याला गंभीर जखम झाल्याने जागीच मृत्यू झाला तर भुपेश बारी (३४) वर्षे यांना जखमी अवस्थेत तुंगा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.नवापूर गावात राहणारे नरेंद्र बारी हे तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अनुह फार्मा तर भूपेश बारी हे जीएम सिंथेटीक या कंपनीत काम करीत होते.

रविवारी संध्याकाळी ७ वाजता दिवस पाळीतील काम संपवून आपल्या घराकडे परतत असताना पाम गावाजवळ नांदगाव समुद्रकिनार्‍यावरून बोईसरकडे येणाया भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये दुचाकी चालवणार्‍या नरेंद्र बारी यांचा जागीच मृत्यू झाला. तर रूपेश बारी यांचा तुंगा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नवापूर गावातील दोघांचा अपघात झाल्याची बातमी पसरताच तुंगा रुग्णालय आणि बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संतप्त स्थानिक नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.या अपघातास कारणीभूत असलेला कारचालक ओमकार प्रकाश पाटील (२२) व आशुतोष मारुती कोनेरी (२४) या दोघांवर सातपाटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.त्यांना आज पालघर न्यायालयात हजर केले असता २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कारमधील तरुण हे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबियांनी केला असून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -