घरपालघरग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; गॅस दरवाढीचा गोरगरीब जनतेला फटका

ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; गॅस दरवाढीचा गोरगरीब जनतेला फटका

Subscribe

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळावी तसेच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे. यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत मोफत गॅसजोडणी करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळावी तसेच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे. यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत मोफत गॅसजोडणी करण्यात आली. मात्र, आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबानी पुन्हा एकदा चुली पेटवत गॅस सिलिंडरला अडगळीची खोली दाखवली आहे. सुरुवातीला दोन-पाच रुपयांची दरवाढ नंतर पंधरा-वीस रुपयांपर्यंत पोहचली. त्यानंतर तर थेट ५० रुपयांची दरवाढ झाली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी या योजनेतून मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या होत्या. आता दरवाढ करताना या कुटुंबाना गृहीतच धरण्यात आलेले नाही. सुरुवातीला सिलिंडरच्या किमती ४०० रुपयांचा घरात होत्या. आता त्या ९०० रुपयांवर गेल्याने लाभार्थींना महिन्याला एवढी रक्कम आणायची कुठून?, असा प्रश्न पडला आहे. गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असल्याने गृहिनींचे बजेट कोलमडले आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न तसेच हातावर पोट असणार्‍यांसमोर तर मोठे संकट उभे राहिले आहे.

गेल्या वर्षापासून कोरोनामुळे आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यातच महिन्या महिन्याला गॅसच्या दरात देखील वाढ होत आहे. त्यामुळे आता आम्हाला पुन्हा चुलीचा आसरा घ्यावा लागत आहे.
– वैशाली कामडी, गृहिणी

- Advertisement -

स्वयंपाकासाठी पुन्हा महिलांना वणवण भटकंती करून गोवर्‍या व सरपणासाठी फिरावे लागते. महिलांचे हे हाल थांबवून व जंगलांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन ग्रामीण भागात जोडण्यात आले. मात्र, सिलिंडरच्या भाव गगनाला भिडल्यामुळे उज्वला योजनेंतर्गत लाभ मिळालेली कुटुंबे आता गॅस महागल्याने पुन्हा चुलीच्या दिशेने वळू लागली आहेत. लाभार्थ्यांचे बजेट कोलमडले असून उज्वला योजनेचे बहुसंख्य लाभार्थी हे ग्रामीण भागातील आहे. घरातील दररोज लागणारा किराणा, भाजीपाला याचा ताळमेळ बसविणे कठीण होत असताना आता गॅस सिलिंडरचे दर कसे परवडणार?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महिन्याला जेमतेम तीन-साडेतीन हजारांची मिळकत असणार्‍या कुटुंबात सिलिंडरसाठी ९०० रुपये आणायचे कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे.

महिन्याप्रमाणे गॅस दरवाढ –

  • डिसेंबर – ५९७ रुपये
  • जानेवारी – ६९७ रुपये
  • फेब्रुवारी – ७७२.५० रुपये
  • मार्च – ९२२ रुपये

हेही वाचा –

Mumbai Corona Update: खासगी रुग्णालयांचे बेड्स कमी पडू लागल्याची महापौरांची कबुली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -