घरपालघरपाण्याच्या टाकीमुळे भूस्खलनाचा धोका; पर्यावरण अभ्यासक चरण भट यांची भिती

पाण्याच्या टाकीमुळे भूस्खलनाचा धोका; पर्यावरण अभ्यासक चरण भट यांची भिती

Subscribe

कशिद-कोपर गावात सुरु असलेल्या टाकीच्या कामामुळे भविष्यात भूस्खलन होऊन गावांना मोठा धोका असल्याची भिती पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी व्यक्त केली आहे.

कशिद-कोपर गावात सुरु असलेल्या टाकीच्या कामामुळे भविष्यात भूस्खलन होऊन गावांना मोठा धोका असल्याची भिती पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी व्यक्त केली आहे. गामस्थांनी संमती दिली तर त्यांच्याच माध्यमातून हे प्रकरण न्यायालयात नेऊ, असे आश्वासन पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी दिले. चरण भट यांनी कशिद-कोपर गावाला भेट देऊन एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व कशिद-कोपर गाव वाचवा संघर्ष समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. वसई-विरार महापालिका व मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरता सूर्या धरण प्रकल्प योजनेतून ४०३ एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेतून वसई-विरार महापालिका व परिसरातील २७ गावांना १८५ एमएलडीतर उर्वरित पाणी मिरा-भाईंदर महापालिकेला देण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेकरता कशिद व कोपर गावांच्या मध्यावर असलेल्या उंच डोंगरावर एमएमआरडीच्या माध्यमातून पाण्याची टाकी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मात्र हे काम करताना एमएमआरडीएने कशिद व कोपर ग्रामस्थांना विश्वासात घेतलेले नाही. या कामाची कोणतीही कल्पना ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही. मागील १५ दिवसांपासून हे काम दिवस-रात्र सुरू केल्यानंतर ग्रामस्थांनी या कामाला विरोध केला आहे. या गावांच्या मध्यावर असलेल्या डोंगरावर हे काम करण्यात येत असल्याने भविष्यात ही गावे पुण्यातील माळीण व महाडमधील तळीये गावांसारखी जमिनीत गडप होतील, अशी भीती या ग्रामस्थांना आहे.

- Advertisement -

एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकासाला ग्रामस्थांचा विरोध नाही, तर भविष्यातील हानीची ग्रामस्थांना चिंता आहे. त्यामुळे निर्मनुष्य वस्ती किंवा जागेवर हा प्रकल्प स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. याकरता कशिद-कोपर ग्रामस्थांनी एमएमआरडीए, पोलीस प्रशासन व वसई-विरार महापालिका यांच्यासोबत पत्रव्यवहारही केलेला आहे. मात्र एकाही प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कशिद-कोपर ग्रामस्थांनी आपल्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून निर्माणस्थळी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनी कशिद-कोपर ग्रामस्थांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनीही कशिद-कोपर गावाला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांची समस्या जाणून घेतली. यावेळी भट यांनी निर्माणस्थळी काही निरीक्षणेही नोंदवली.

कशिद-कोपर गावातील डोंगर हा सर्व्हे क्र. १९१ मध्ये मोडत असूनही जागा संरक्षित वन म्हणून घोषित केलेली आहे. या जागेवरील शेकडो सागवान झाडांची तोड करण्यात आलेली आहे. यातील जास्तीत जास्त झाडांचे पुनर्रोपण करणे अपेक्षित असतानाते केलेले नाही, याकडे भट यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले. वनवासी व अनुसूचित जमातीतील ग्रामस्थांचे हक्क डावलून शहरी ग्रामस्थांकरता ही योजना राबवण्यात येत नाही ना?, याबाबतही भट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कशिद-कोपर गावातील निर्माण स्थळाची एकंदर स्थिती लक्षात घेता नोडल एजन्सीने परिसराचे सर्व्हेक्षण केलेले नाही. किंवा एमएमआरडीएला चुकीची माहिती दिली असावी, अशी शंका भट यांनी व्यक्त केली. या कामाकरता पर्यावरण आणि वनविभागाच्या परवानगींबाबतही त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

- Advertisement -

दरम्यान, हा डोंगर मुरुम-मातीचा असल्याने भूस्खलन होऊन गावांना हानी पोहोचेल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. डोंगराच्या दोन्ही बाजूंना नैसर्गिक ओहोळ आहेत. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नाल्यांमुळे आधीच या गावांतील घरादारांत पाणी शिरते. आता तर पाण्याच्या टाकी निर्माणामुळे डोंगर आणि झाडे जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. त्यामुळे ही भीती कैक पटीने वाढली असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या डोंगरांच्या पायथ्याशीच कशिद व कोपर गावे आहेत. त्यांच्या समोरूनच तानसा नदी वाहते. या नदीच्या शेजारीच जलवाहिनी नेण्याकरता एमएमआरडीएने नदीशेजारील तिवरांच्या झाडांचीही मोठ्या प्रमाणात तोड केलेली आहे. परिणामी पावसाळ्यात या नदीला पूर आल्यास हे पाणी गावांत शिरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पाण्याची टाकी निर्माण करण्याकरता डोंगरांतून आलेले नैसर्गिक नाले अडवण्यात आल्याने भूस्खलनाची भीती तर आहेच, पण तिवरांच्या कत्तलीमुळे नदीचा प्रवाही गावांत शिरकाव करणार असल्याने ग्रामस्थांसमोर दुहेरी मरण आहे.

विशेष म्हणजे याकामामुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगरांतून निघणाऱ्या मोठ्या प्रमाणातील मातीचा भराव गावातीलच शेतीत नेऊन टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी कशिद-कोपर ग्रामस्थांनी मांडल्या आहेत.

हेही वाचा – 

गुढीपाडव्यापूर्वी निर्बंध शिथिल करण्याच्या हालचालींना वेग, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -