घरताज्या घडामोडीजगातील सर्वात उंचीचा रस्ता भारतात वाहतुकीसाठी खुला, काय आहेत वैशिष्ट्ये ?

जगातील सर्वात उंचीचा रस्ता भारतात वाहतुकीसाठी खुला, काय आहेत वैशिष्ट्ये ?

Subscribe

अतिशय प्रतिकुल आणि आव्हानाच्या परिस्थितीत तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील आविष्कार असा जगातील सर्वात उंच रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या रस्त्याचा भारतीय सैन्यासोबतच स्थानिकांनाही फायदा होणार आहे. लडाख भागात सामाजिक आणि आर्थिक अशा विकासासाठी हा रस्ता उपयुक्त ठरेलच. पण त्यासोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रस्ता महत्वाचा मानला जात आहे. या रस्त्याचे उद्धाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. अतिशय उंचीवर असणाऱ्या रस्त्यावर ऑक्सिजन पातळी ते उष्ण तापमानाचेही वेगळेच आव्हान आहे. पण एक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून हा एक नवा विक्रम भारतातील रस्ते विकास करणाऱ्या बीआरओ या संस्थेने केला आहे. त्यामुळेच या रस्त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चिसुमले – डेमचोक या सर्वात उंच अशा मार्गाचे उद्घाटन केले. जगातील सर्वात उंच अशा १९०० फुट उंचीवर असणारा हा मार्ग आहे. दक्षिण लडाखमध्ये चिसुमले – डेमचोक मार्गावर सर्वात महत्वाचा असा हा मार्ग आहे. चीनला लागून असलेल्या सीमा भागात हा मार्ग सैन्यांच्या वाहनांसाठीही उपयुक्त असा ठरणार आहे. एक इंजिनिअरींगचा चमत्कार म्हणूनच हा मार्गाकडे पाहिले जात आहे. इतक्या उंच ठिकाणी रस्ता विकसित करताना अनेक आव्हानांचा सामना करत या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या रस्त्याची प्रमुख अशी सहा वैशिष्ट्ये आहेत.

- Advertisement -

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश

देशातील सर्वात उंच असा रस्ता ज्यावर गाडी चालवणे शक्य होणार आहे. पूर्व लडाख येथे हा रस्ता १९ हजार ३०० फूट उंचीवर आहे. या रस्त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. अतिशय डोंगराळ भागातून या रस्त्याचे बांधकाम करताना ५२ किलोमीटरचा मार्ग विकसित करण्यात आला आहे. उमलिंगचा रस्ता हा पूर्व लडाखच्या चुमार क्षेत्रातील महत्वपूर्ण अशा शहरांना जोडण्याचे काम करतो.

कोणतो रेकॉर्ड मोडला ?

या रस्त्याने बोलीविया स्थित १८ हजार ९५३ फुटाच्या रस्त्याचा विक्रम मोडला आहे. बोलीविया येथील रस्ता उटुरूंकु या ज्वालामुखीसोबत जोडला जातो.

- Advertisement -

माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षाही उंच

रस्त्याच्या महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या बेस् कॅंपपेक्षाही हे उंच आहे. तिब्बत येथे उत्तर भागातील बेसच्या माध्यमातून १६ हजार ९०० फूट उंचावर हे बेस कॅम्प आहे. तर नेपाळच्या दक्षिण बेस कॅम्प १७ हजार ५९८ फुटांवर हा बेस कॅम्प आहे. माऊंट एव्हरेस्ट शिखरापेक्षा २९ हजार फूटापेक्षा हा रस्ता थोडासा उंच आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनच्या प्रयत्नामनुळे जगातील सर्वाधिक उंच रस्त्यावर वाहन चालवण्याचा दावा करणे शक्य झाले आहे. बीआरओ ही भारतातील सशस्त्र दल असून रस्ते विकसित करणारी ही एजन्सी आहे. बीआरओला भारतातील उत्तर भागातील सीमा भागात दुर्गम भागात रस्ते विकसित करण्याचे तंत्रज्ञान उभारले आहे.

ड्रायव्हर्ससाठी आव्हान

हा रस्ता वाहन चालकांसाठी अतिशय आव्हानाचा असणार आहे. संरक्षण मंत्रालयानुसार या भागातील तापमान हे ४० डिग्री पर्यंत वाढ शकते. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी या तापमानाला इतर सामान्य ठिकाणांच्या तुलनेत ५० टक्के कमी असते. त्यामुळेच याठिकाणी जास्त वेळ राहणे हे अधिक आव्हानाचे होते. पण या रस्त्याची उपलब्धतता ही स्थानिक लोकांसाठी एकप्रकारे वरदानच आहे. लेह पासून चिसुमले आणि डेमचोकला जोडणाऱ्या एक सरळ असा पर्याय म्हणून या रस्त्याकडे पाहिले जात आहे. तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतही हा पर्याय अधिक सुधारणा करण्यासाठी कारणीभूत ठरेल असे बोलले जात आहे. त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल असे मत संरक्षण मंत्रालयाने मांडले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -