घरपालघरमीरा भाईंदरमध्ये ’एसआरए’ व क्लस्टर योजना लवकरच लागू होणार

मीरा भाईंदरमध्ये ’एसआरए’ व क्लस्टर योजना लवकरच लागू होणार

Subscribe

यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, गिलबर्ट मेंडोन्सा, युवा नेते पूर्वेश सरनाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

भाईंदर :- ठाणे व मुंबईप्रमाणे मीरा- भाईंदरचा झपाट्याने विकास होत आहे. आमदार प्रताप सरनाईक नेहमी सरकारकडे मीरा -भाईंदरसाठी पाठपुरावा , संघर्ष करतात आणि त्यांनीच आतापर्यंत शेकडो कोटींचा विकास निधी मीरा -भाईंदरसाठी मंजूर करून आणला आहे. आता त्यांच्याच मागणीप्रमाणे मीरा- भाईंदर शहरातील धोकादायक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ’क्लस्टर योजना’ व झोपडपट्टी पुनर्वसन योजना मीरा भाईंदरमध्ये लागू केली जाईल , अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरारोड येथे बोलताना केली. तसेच मीरा -भाईंदर मेट्रोचे कारशेड पुढे उत्तनच्या शासकीय जमिनीवर नेण्याचे संकेतही त्यांनी भाषणात दिले.प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्याकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान , इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे संस्कृती मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
फेस्टिव्हलच्या समारोपाच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे हे उपस्थित राहिले व त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी देशात प्रसिद्ध असलेले कवी डॉ. कुमार विश्वास यांचा ’ इंडियन हिंदी पोएट’ हा कार्यक्रम काल हजारोंच्या गर्दीत उदंड प्रतिसादात पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांचे आमदार सरनाईक यांनी स्वागत केले. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, गिलबर्ट मेंडोन्सा, युवा नेते पूर्वेश सरनाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

- Advertisement -

दहिसर – भाईंदर लिंक रस्त्याचे भूमिपूजन लवकरच

1800 कोटी खर्च करून दहिसर – भाईंदर लिंक रस्त्याचे भूमिपूजन पुढील महिन्यात करून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याकडे आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर दहिसर – भाईंदर लिंक रस्त्याचे आम्ही लवकरच काम सुरु करत आहोत. म्हणजे टोलनाका बायपास होईल , असे सांगत हा लिंक रस्ताही वेगाने पूर्ण करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -