घरपालघरबंद कारखान्यातील भंगार चोरी प्रकरणात गुन्हा दाखल

बंद कारखान्यातील भंगार चोरी प्रकरणात गुन्हा दाखल

Subscribe

असून इतर संशयित मुख्य आरोपी मोकाट असून बोईसर एमआयडीसी पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केल्या जात आहेत.

बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद अवस्थेत असलेल्या ओरा ऑईल कंपनीमधील भंगार चोरी प्रकरणी दीड महिन्यानंतर बोईसर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीत भंगार चोरी सुरू असताना गॅस कटरच्या सिलेंडरचा स्फोट होऊन एक कामगार गंभीर जखमी झाला होता.जीएसटी विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी निष्पन्न झाला आहे. तर चार संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बोईसर पोलिसांनी दिली. बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय ३७९, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करून अकत्तर खान या आरोपीला अटक करण्यात आली असून इतर संशयित मुख्य आरोपी मोकाट असून बोईसर एमआयडीसी पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केल्या जात आहेत.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कुंभवली ग्रामपंचायत हद्दीतील ओरा ऑइल कंपनी गेल्या आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.29 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी साडे चार वाजताच्या सुमारास भंगार चोरीच्या उद्देशाने भंगार माफिया गॅस कटर आणि अन्य सामग्रीसह कंपनीमध्ये शिरले होते. गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडाची कटिंग सुरू असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एक कामगार गंभीर जखमी झाला होता. भंगार माफियाला सहकार्य करणारे स्थानिक इसम जेसीबी आणि क्रेन घेऊन घटनास्थळावरून पळून गेले होते. स्फोटाची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विझवली होती. बोईसर पोलिसांनी स्फोटात जखमी झालेल्या कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. औरा ऑईल कंपनी गेल्या आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या कंपनीमधील भंगार चोरी प्रकरणात सुरुवातीपासूनच संशयाचा धूर निर्माण झाला आहे. घटनेच्या दिवशी दुपारी कंपनीचे गेट उघडून कंपनीच्या आवारातील भंगार चोरीसाठी पाच-सहा व्यक्ती, जेसीबी आणि क्रेन घेऊन शिरल्याची माहिती कंपनीतील एका माजी कामगाराने बोईसर पोलिसांना फोन करून दिली होती.

- Advertisement -

भंगार माफियांना चोरी करताना रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी हालचाल केली नसल्याचा आरोप कंपनीतील माजी कामगारांनी केला होता. कारखान्यात उत्पादन बंद झाल्यानंतर जीएसटी विभागाचे देयक आणि बँकेच्या कर्जाचे हफ्ते थकल्याने कंपनीची मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहे. उत्पादन बंद झाल्याने कामगारांची देणी थकली आहेत.
कंपनीमधील 80 टक्के यंत्रसामग्री चोरट्यांनी लांबवली आहे.आतापर्यंत कंपनीमध्ये दोन ते तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. 29 ऑक्टोबर रोजी औरा ऑईल कंपनीत भंगार चोरी आणि स्फोट प्रकरणात बोईसर पोलिसांनी तीन संशयीत व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले होते. चोरीच्या घटनेत वापरलेली क्रेन सुद्धा ताब्यात घेतली होती.चौकशीनंतर सर्वांना सोडून देण्यात आले होते. कंपनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांना चोर आणि जेसीबी व क्रेन चालकाचा माग काढणे सहज शक्य होते. जखमी कामगाराने चोरीत सहभाग असलेल्या संशयितांची माहिती दिली असताना गुन्हा दाखल करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागल्याने संशय व्यक्त केला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याने बोईसर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ओरा ऑईल कंपनीमध्ये झालेल्या भंगार चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे
– प्रदीप कसबे ,पोलीस निरीक्षक बोईसर,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -