घरपालघरचिंचणी समुद्रकिनार्‍यावर विद्यार्थ्यांचा धिंगाणा

चिंचणी समुद्रकिनार्‍यावर विद्यार्थ्यांचा धिंगाणा

Subscribe

बरेच पर्यटक हे समुद्राच्या पाण्यात खोलवर जाण्याचे प्रकार घडत असून त्यांना अटकाव करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नियुक्त केलेला जीवरक्षक हा अनेक वेळा जागेवरून गायब असतो.

बोईसर: पालघर जिल्ह्यातील नयनरम्य चिंचणी समुद्रकिनारा हा काही पर्यटकांच्या बेशिस्त वागणुकीमुळे भलताच बदनाम होऊ लागला आहे.मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास बोईसरमधील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी भर समुद्र किनार्‍यावर धावत्या कारच्या टपावर बसून आरडाओरड करीत मोठा धिंगाणा घालण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी स्थानिकांनी धिंगाणा घालणार्‍या विद्यार्थ्यांना पकडून त्यांची चांगलीच कान उघाडणी केल्यावर माफी मागत या विद्यार्थ्यानी समुद्र किनार्‍यावरून काढता पाय घेतला.परंतु समुद्रकिनार्‍यावर मद्यधुंद अवस्थेत धुडगूस घालण्याचे असे प्रकार वारंवार घडत असल्याने व त्यावर अंकुश घालणारे कोणीही नसल्याने इतर पर्यटकांची सुरक्षिता मात्र यामुळे धोक्यात येऊ लागली आहे.

चिंचणी समुद्रकिनार्‍यावर मौजमज्जा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसून स्थानिक ग्रामपंचायत फक्त पावत्या फाडण्यापलीकडे कोणतीही सुविधा उपलब्ध करून देत नाही.बरेच पर्यटक हे समुद्राच्या पाण्यात खोलवर जाण्याचे प्रकार घडत असून त्यांना अटकाव करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नियुक्त केलेला जीवरक्षक हा अनेक वेळा जागेवरून गायब असतो.

- Advertisement -

बॉक्स

चिंचणी समुद्र किनार्‍यावर बेशिस्त आणि मद्यपी पर्यटकांनी धुडगूस घालण्याच्या घटना या पूर्वी देखील अनेक वेळा घडल्या आहेत. १२ जुलै २०२१ रोजी मुंबई येथून आलेल्या काही मद्यधुंद पर्यटकांनी चिंचणी समुद्रकिनार्‍यावर धिंगाणा घालीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच या मद्यधुंद पर्यटकांनी अंगावर गाडी घालण्याचा तसेच धक्काबुक्की करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.त्याचप्रमाणे २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने प्रचंड गर्दी झालेल्या चिंचणी समुद्रकिनार्‍यावर एका कारने १२ पर्यटकांना चिरडले होते.यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता तर एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -