घरपालघरबालमृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा

बालमृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा

Subscribe

ही घटनाच वाईट असल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले.तसेच आमदार भुसारा यांनी कारेगांव हट्टीपाडा, नाशेरा,या गावांना भेटी देत तेथील समस्या जाणून घेतल्या.

ज्ञानेश्वर पालवे,मोखाडा :  तालुक्यातील सावर्डे या ठिकाणी दोन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच आमदार सुनिल भुसारा यांनी या गावात जावून या दोन्ही कुटुंबाची भेट घेतली. तसेच आर्थिक मदत करीत त्या कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी उपस्थित आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग यांच्याशी चर्चा करून या भागाला कुपोषण बालमृत्यूचा लागलेला कलंक पुसणे आवश्यक असून यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. कुपोषणाबाबतची आजची स्थिती पुर्वीपेक्षा कमी भयावह असली तरी बालमृत्यू होणे मात्र गंभीरच आहे. यात चूक कुणाची काय झाले? हा मुद्दा नंतरचा असला तरी बालकांचा मृत्यू होणे ही घटनाच वाईट असल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले.तसेच आमदार भुसारा यांनी कारेगांव हट्टीपाडा, नाशेरा,या गावांना भेटी देत तेथील समस्या जाणून घेतल्या.

कुपोषण बालमृत्यूसाठी ज्याप्रमाणे आरोग्य एकात्मिक बालविकास यांच्यावर जबाबदारी येते. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर रोजगाराची कामे न करणार्‍या यंत्रणांनाही यासाठी जबाबदार धरायला हवे असेही भुसारा यांनी यावेळी सांगितले.यामुळे रोजगार हमी नियमानुसार वर्षभर पुरेल अशी कामे टप्प्याटप्प्याने सर्वच यंत्रणांनी काढावीत असे आवाहनही केले. यावेळी गटविकास अधिकारी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी भाउसाहेब चित्तर,नायब तहसीलदार पोलीस उपनिरीक्षक भुसार आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -