घरपालघरसायरस मिस्त्री अपघातस्थळी टेम्पोला अपघात

सायरस मिस्त्री अपघातस्थळी टेम्पोला अपघात

Subscribe

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव टेम्पोच्या धडकेत धक्का शोषक यंत्राचा चुराडा झाला असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.

डहाणू: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले त्या ठिकाणी पुन्हा एका टेम्पोचा अपघात झाला आहे. या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाकडून धक्का शोषक यंत्र कार्यान्वित करण्यात आले असले तरीही अपघातावार नियंत्रण ठेवण्यास ही यंत्रणा अकार्यक्षम ठरत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव टेम्पोच्या धडकेत धक्का शोषक यंत्राचा चुराडा झाला असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे सप्टेंबर 2022 मध्ये अपघाती निधन झाले. मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी नजिक घोळ गावाच्या हद्दीत सूर्या नदी पुलाच्या आधी अचानक दुभाजनार्‍या महामार्गाच्या पट्ट्यात वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न येऊन पुलाच्या कठड्याला धडकून अपघात होतात. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीवर टीकेची झोड उठली होती. त्यांनतर यावर उपाययोजना म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या कठड्याच्या सुमारे दहा मीटर आधी वाहनांच्या धडकेचा धक्का शोषून घेणारे यंत्र कार्यान्वित केले होते. तसेच तंत्राच्या बाजूला वाहन चालकांना सावध करणारे रिफ्लेक्टर बसवण्यात आले होते. असे असताना देखील अनेक वाहने रिफ्लेक्टरला आदळून रिफ्लेक्टर तोडल्याचा घटना घडल्या असून यापूर्वी देखील या ठिकाणी किमान दोन अपघात घडल्यामुळे अपघाताची रस्त्याच्या तांत्रिक चुकांमुळे अपघाताची मालिका सुरूच आहे.

- Advertisement -

गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका भरधाव टेंपोने येथील धक्का शोषक यंत्राला धडक दिली असून यामध्ये धक्का शोषक यंत्र मुळापासून उखडून गेला आहे. ते अजूनही पूर्ववत करण्यात आलेले नसून यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. गुरुवारी घडलेल्या अपघातामुळे महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येणार्‍या उपाययोजना कमकुवत असून तकलादू पद्धतीने काम करून महामार्ग प्रशासनाकडून वेळ मारून नेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -