घरपालघरजागा ताब्यात नसताना पूलाचे काम; ५ कोटी ६४ लाखाची निविदा

जागा ताब्यात नसताना पूलाचे काम; ५ कोटी ६४ लाखाची निविदा

Subscribe

महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक महापालिका आयुक्तांची दिशाभूल करून मंजुरी घेतली.

जागा ताब्यात नसतानाही रस्ता आणि पूल बांधण्याच्या ५ कोटी ६४ लाख रुपयांची निविदा महापालिकेने मंजूर केली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया करताना तसेच कार्यादेश देताना महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक महापालिका आयुक्तांची दिशाभूल करून मंजुरी घेतली. तसेच हा कार्यादेश तातडीने रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. विरार पश्चिम येथील बोळींज हद्दीत विरार गार्डन, मेफेयर बिल्डर ते अेब्रोल कॉम्प्लेक्सपर्यंत विकास आराखड्यातील २० मीटर रस्ता रुंदी विकसित करणे. तसेच हा रस्ता म्हाडाच्या रस्त्याला जोडण्यासाठी अपंग पुनर्वसन केंद्राच्याजवळ नाल्यावर आरसीसी पुलाचे बांधकाम करण्याबाबत महापालिकेच्या बांधकामविभागाने मे. मेघना इंटरप्राईजेस यांना ४ जानेवारी २२ रोजी ५ कोटी ६४ लाख रुपयाचा कार्यादेश दिला आहे.

हा रस्ता विकसित करताना सध्या अस्तित्वात असलेल्या बोळींज-आगाशी रस्त्याला पर्यायी रस्ता निर्माण होऊन वाहतुककोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल, अशा पद्धतीची माहिती दिली जाते. परंतु या रस्त्यासाठी लागणारी जमीन आजही शेतकऱ्यांच्या खासगी मालकीची आहे. त्याठिकाणी आजही शेती सुरू आहे. महापालिकेने ही जागा ताब्यात घेण्यासंदर्भात कुठलीही कारवाई केलेली नसताना थेट रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर करून ठेकेदाराला कार्यादेश कोणत्या आधारे दिले?, असा प्रश्न उपस्थित होतो.

- Advertisement -

दुसऱ्या बाजूला याच कार्यादेशमध्ये पहिल्या टप्प्याच्या कामांतर्गत म्हाडा वसाहतीमधील रस्त्याला जोडणारा नाल्यावरील आरसीसी पूल बांधण्याच्या कामासाठी ३ कोटी १५ लाख रुपयाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यासाठी जागा महापालिकेच्या ताब्यात नाही. त्यामुळे हा रस्ता पूर्ण होणार नाही. पर्यायाने सामान्य लोकांना त्याचा काहीच उपयोग नाही, असे असताना या रस्त्याच्या कामाअंतर्गत खाडीवर आरसीसी पूल नक्की कुणाच्या फायद्यासाठी बांधला जात आहे?, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. विरार गार्डनमध्ये नवीन इमारतींचे बांधकाम सुरू असून म्हाडामधील रस्त्यावरून अजून एक पर्यायी रस्ता मिळण्याचा व पर्यायाने जास्त बांधकाम मंजूरी मिळण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला फायदा मिळावा म्हणून हा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा –

आता नाना पटोले अयोध्या दौरा करणार?, अयोध्येतील महंत बृजमोहन दासकडून निमंत्रण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -