घरपालघरवसईचा ठसा आणि रंग उमटला सातासमुद्रापार

वसईचा ठसा आणि रंग उमटला सातासमुद्रापार

Subscribe

या प्रदर्शनातील कलाकृतींना कॅलिफोर्निया स्थीत भारतीय आणि स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन चित्रकार कुलकर्णी यांचे कौतुक केले.

वसईः वसईचे सुपुत्र आणि व्यासंगी चित्रकार श्रीहर्ष कुलकर्णी यांचे दिवाळी सुट्टीनिमित्त भरवण्यात आलेले पहिले वहिले डिजिटल आर्ट पेंटीगचे प्रदर्शन अमेरिकेतील प्लेझंटन कॅलिफोर्निया येथे संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन गेली पन्नास वर्षे अमेरिकेत वास्तव्याला असलेले वैज्ञानिक डॉ. सतिष कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनातील कलाकृतींना कॅलिफोर्निया स्थीत भारतीय आणि स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन चित्रकार कुलकर्णी यांचे कौतुक केले.

एक प्रसिध्दी पराडमुख आणि व्यासंगी चित्रकार असलेल्या श्रीहर्ष कुलकर्णी यांची विविध विषयांवरील चित्रे आकर्षक तशीच लक्षवेधी असून, कल्पकता आणि वैशिष्ट्येपूर्ण रंगसंयोजन यामुळे त्यांच्या दर्जात भर पडल्याचे कौतुकोद्गार वैज्ञानिक डॉ. सतिष कुलकर्णी यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना काढले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत भावभावनांचे आणि वास्तवतेचे दर्शन होत असल्याच्या प्रतिक्रिया दर्शकांकडून यावेळी व्यक्त झाल्या. केवळ आवड आणि कलेच्या आसक्तीतून त्यांनी चित्रकलेची जोपासना केलेली असून, कोणतेही खास प्रशिक्षण किंवा मार्गदर्शकाशिवाय काढलेली ही चित्रे, हेच त्यांचे वैशिष्ठ्य असल्याचेसरोज कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानताना यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -