घरपालघर...तर गावितांचा पराभव होईल,भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षांचा इशारा

…तर गावितांचा पराभव होईल,भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षांचा इशारा

Subscribe

त्यामुळे या जागेचा महायुतीत तिढा सुटू शकलेला नाही. भाजपमधील काही इच्छुकांनी गावितांना भाजपमधून उमेदवारी देण्यास विरोध कायम ठेवला आहे.

वसईः पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीत जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. खासदार राजेंद्र गावीत इच्छुक असून महायुतीतून शिवसेना शिंदे गट अथवा भाजपमधूनही निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, भाजपमधून गावितांना उमेदवारी देण्यास विरोध सुरु असून भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षांनी भाजपने उमेदवारी दिली तर गावितांचा पराभव होईल, असा इशारा पक्षाला दिला आहे. त्यामुळे महायुतीत पालघरच्या जागेवरून असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राजेंद्र गावीत विद्यमान खासदार आहेत. शिंदे गटाकडून या जागेवर आग्रह असून गावितांनाच परत मैदानात उतरवण्याची तयारी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी ही जागा भाजपला मिळावी, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे या जागेचा महायुतीत तिढा सुटू शकलेला नाही. भाजपमधील काही इच्छुकांनी गावितांना भाजपमधून उमेदवारी देण्यास विरोध कायम ठेवला आहे.

गावित २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यावेळी राज्यातील ठाकरे आणि भाजप युती सरकारमध्ये संघर्ष झाला होता. तेव्हा ठाकरे गटाने श्रीनिवास वनगा यांना पोटनिवडणुकीत उभे केले होते. त्यात वनगा यांचा पराभव करत गावीत निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पालघरची जागा शिवसेनेला सोडली होती. तेव्हा राजेंद्र गावीत यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढून जिंकली होती. आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून शिवसेनेत फूट पडल्यानंतर गावितांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघरचा खासदार आमचा असल्याने ही जागा सोडावी, असा आग्रह शिंदे गटाकडून केला जात आहे. त्याला भाजपमधून विरोध होऊ लागला आहे. ही जागा भाजपचीच असल्याने ती सोडावी, असा भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांचा आग्रह आहे. त्यातूनच जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपला ही जागा सुटली तर राजेंद्र गावीतच उमेदवार असतील, अशी चर्चा सुरु असून गावितांना उमेदवारी देण्यास भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी विरोध केला आहे. भाजपने गावितांना उमेदवारी दिली तर गावितांचा पराभव होईल, असा इशाराच आता भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी दिला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात ताकद असल्याने भाजपचा उमेदवार असेल तरच निवडून येईल, असेही राजपूत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजेंद्र गावितांची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात राजेंद्र गावीत राज्यमंत्री असताना भरत राजपूत हे गावितांचे अतिशय जवळचे मानले जायचे. गावितांनीच राजपूत यांना काँग्रेसमध्ये मोठे केले होते. डहाणू बँकेच्या घोटाळ्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या भरत राजपूत यांना गावितांनी सर्वतोपरी मदत केली होती. आता तेच राजपूत गावितांच्या विरोधात गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -