घरपालघरमाघी गणेशोत्सवाला पारंपरिक वादकांची वाद्यातून सलामी

माघी गणेशोत्सवाला पारंपरिक वादकांची वाद्यातून सलामी

Subscribe

यावेळी आपल्या कलेतून आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करणारे आठ वादक आपापल्या साहित्यासह उपस्थित होते.

अतिक कोतवाल,जव्हार: जव्हार शहरातील माघी गणेशोत्सवाला जव्हार व मोखाडा तालुक्यातील पारंपारिक वादकांनी सदिच्छा भेट देऊन आपल्या कलेच्या माध्यमातून लाडक्या गणरायाला वाद्य वाजवीत सलामी दिली.या वेळी माघी गणेशोत्सव मंडळाचे सदस्य चित्रांगण घोलप यांनी या वादकांचा आदर सन्मान केला. गणराज्य दिन साजरा करीत असताना हे पारंपरिक वाद्य वाजविणारे वादक अचानक जव्हार शहरात दाखल झाल्यानंतर गणराया चरणी नतमस्तक होऊन आपली कामना व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्व सहकार्‍यांच्या मदतीने व सर्व सहकारी त्यांच्याकडे असलेले कौशल्य सादर करीत शहरातील गांधी चौक येथे वाद्य वाजवून तेथील नागरिकांचे मनोरंजन केले. यावेळी आपल्या कलेतून आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करणारे आठ वादक आपापल्या साहित्यासह उपस्थित होते.

 

- Advertisement -

पारंपरिक वादक हे आपल्या कलेच्या माध्यमातून आपले कुटुंब सांभाळत आहेत. परंतु सध्या इलेक्ट्रॉनिक वाद्याचा जमाना आल्याने पारंपारिक वाद्य आणि कला लोप पावत चालले आहे. अशा कलाकारांना उपासमारीची वेळ आली असल्याने त्यांना राज्य शासनाच्या कलाकार मानधन योजनेतून दरमहा मानधन चालू करणे गरजेचे आहे.

– इमरान कोतवाल उपाध्यक्ष,पालघर जिल्हा,संभाजी ब्रिगेड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -