घरपालघर३४ जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

३४ जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

Subscribe

वेळोवेळी नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मीरा- भाईंदरमध्ये होळी व रंग पंचमी निमित्त नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

भाईंदर :- मीरा-भाईंदर शहरात होळी व धुलीवंदनाच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणार्‍या ३४ जणांवर काशीमीरा वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. तर इतर ट्रिपल सीट, सीटबेल्ट न लावणे हेल्मेट न वापरणे अशा एकूण ५९ जणांवर कारवाई केली आहे.शहरात कोणत्याही धर्माचा सण असेल तेव्हा वाहतूक पोलीस व वाहतूक पोलीस हे स्वतः सण साजरा न करता नागरिकांच्या सुविधेसाठी काम करत असतात. वेळोवेळी नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मीरा- भाईंदरमध्ये होळी व रंग पंचमी निमित्त नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक पोलिसांनी सात स्थानिक पोलीस ठाण्यांतील पोलिसांच्या सहाय्याने ३४ वाहनचालकांवर होळी आणि त्यानंतरच्या रंग-पंचमीच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. मद्यपान करून वाहन चालविण्याच्या ३४ प्रकरणांव्यतिरिक्त, ५९ दुचाकीस्वारांवर ट्रिपल-सीट आणि हेल्मेट न घालणारे व इतर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वर्षी मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -