घरपालघरआदिवासी विकास महामंडळातर्फे सफाळ्यातील भात खरेदी केंद्राची तपासणी

आदिवासी विकास महामंडळातर्फे सफाळ्यातील भात खरेदी केंद्राची तपासणी

Subscribe

आदिवासी विकास महामंडळाचे पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील पारगाव भात खरेदी केंद्र २२ डिसेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली होती.

आदिवासी विकास महामंडळाचे पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील पारगाव भात खरेदी केंद्र २२ डिसेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली होती. आतापर्यंत २१२ शेतकर्‍यांकडून ४७१७ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. परंतु पारगाव भात खरेदी केंद्रात ऑनलाईन नोंदीपेक्षा अधिकचा भाताचा साठा खासगी व्यापाराकडून करण्यात आला होता. शेतकर्‍यांकडून स्वस्त दरात भात खरेदी करून ज्यादा दरात विक्री करण्यासाठी केंद्राच्या गोदामात ठेवल्याची तक्रार काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक जयराम राठोड यांनी गुरुवारी पारगाव खरेदी केंद्राला भेट देत पाहणी करण्यात आली.

गोदामाची पाहणी केल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने गोदाम सिल करण्याचे आदेश दिले. भरडाईचे आदेश दिल्यानंतर खरेदी केलेल्या भाताचे वजन केल्यानंतर गैरप्रकार असल्यास समोर येईल आणि तसे आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोदामाची साठवण क्षमता संपली असून भाताचा गोण्यांचा ढिग कोसळून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली. शेतकर्‍यांना सोयीसाठी नवीन ठिकाणी भात खरेदी सुरू करून भाताच्या साठवणीची व्यवस्था करण्याचे निर्देश व्यवस्थापक विनय येडगे यांना दिले. पीक पाहणी नोंद नसल्याने विक्रीसाठी आणलेला भात गोदामात ठेवून घेतल्याच्या आरोपात काही तथ्य नसल्याने त्यांनी सांगितले.

- Advertisement -

महाव्यवस्थापकांच्या भेटी आधीच पाचशे क्विंटल भाताच्या भरडाईचे आदेश देऊन प्रत्यक्ष ३२५ क्विंटल भात भरडाईसाठी केंद्रालगतच्या मंगलम मिलच्या व्यवस्थापनाकडून उचल करण्यात आली आहे. मिलमार्फत भाताची भरडाई सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी, पीक पाहणीच्या नोंदीत येणार्‍या अडचणी, साठवणुकीच्या अपुरी क्षमतेमुळे शेतकर्‍यांना ३० जानेवारीपर्यंत भात विक्री करणे शक्य नसल्याने शेतकर्‍यांकडून भात खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी केली जात आहे. खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांनी मुदतवाढीचा मागणी करावी, शेतकर्‍यांची मागमी वरिष्ठ कार्यालयात आल्यानंतर आवश्यक कार्यवाही केली जाईल. परंतु ऑनलाईन नोंदणी झालेले आणि प्रत्यक्ष भात विक्री न शकलेल्या शेतकर्‍यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता महाव्यवस्थापक जयराम राठोड यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – 

रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजूर करा; वर्षा गायकवाडांचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -