घरपालघरविरार दुर्घटना,आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार सुनील शिंदे यांच्याकडून सांत्वन

विरार दुर्घटना,आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार सुनील शिंदे यांच्याकडून सांत्वन

Subscribe

झाल्या घटनेचे आपल्याला दु:ख असून, आपण या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत. आपल्याला लागणारी सर्वतोपरी मदत बविआच्या माध्यमातून केली जाईल, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याप्रसंगी दिले.

वसईः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला विरार-मनवेलपाडा येथून कारगिल नगर येथे निघालेल्या मिरवणुकीदरम्यान विजेचा जबर धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या रूपेश सुर्वे (30) आणि सुमित सुत (23) या तरुणांच्या घरी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वना केली. झाल्या घटनेचे आपल्याला दु:ख असून, आपण या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत. आपल्याला लागणारी सर्वतोपरी मदत बविआच्या माध्यमातून केली जाईल, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याप्रसंगी दिले.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर दुर्घटनेनंतर तातडीने मृत तरुणांच्या घरी पोहचले. त्यानंतर विरोधी पक्षांनीही सूत्रे हलवली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांनीही कुटंबियांची भेट घेतली.

- Advertisement -

दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती आमदार रवींद्र फाटक यांनी दिली. तर आमदार सुनील शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्यासह कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना तातडीची मदत म्हणून वीस हजार रुपयांची मदत केली. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आपण इथे भेट दिली असून या सर्वांना आवश्यक ती मदत केली जाईल. मुंबईत उपचारासाठी दाखल असलेल्या तरुणांच्या प्रकृतीवर आपण लक्ष ठेवून असल्याचेही आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -