घरपालघरवाडा ग्रामीण रूग्णालय की वाहनतळ ?

वाडा ग्रामीण रूग्णालय की वाहनतळ ?

Subscribe

नोकरी धंद्यासाठी ठाणे, मुंबई आणि कल्याण येथे जाणारा तालुक्यातील नोकरदार रूग्णालयाच्या आवारात चारचाकी दुचाकी वाहने पार्किंग करून ठेवतात.

वाडा : वाडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात अस्ताव्यस्त वाहने लावली जात आहेत. याचा रूग्णांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी रूग्णांचे नातेवाईक करीत आहेत. वाडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाडा ग्रामीण रूग्णालय आहे. या रूग्णालयाच्या समोरच बसस्थानक आहे. नोकरी धंद्यासाठी ठाणे, मुंबई आणि कल्याण येथे जाणारा तालुक्यातील नोकरदार रूग्णालयाच्या आवारात चारचाकी दुचाकी वाहने पार्किंग करून ठेवतात. त्यामुळे येथे वाहनांचा तळच असल्याचे पाहावयास मिळते. या गाड्या कुठेही लावल्या जात असल्याने रूग्णालयातील रूग्णवाहिका काढण्यासाठीही कसरत करावी लागते. अतितातडीच्या वेळी रूग्णांना याचा त्रास होत आहे. यासंदर्भात वाडा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुनिल भडांगे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतीत वाडा पोलीस ठाण्यात अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.आम्हीही अनेकदा समज दिली आहे.मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत वाहनचालक नाहीत अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -