घरपालघरपाणी नेमके झिरपलेय कुठे ?

पाणी नेमके झिरपलेय कुठे ?

Subscribe

.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारमुळे सुरवातीपासूनच या योजनेची रखडपट्टी सुरू आहे. वाणगाव पश्चिमेकडील गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी नादुरुस्त झाल्याने गळती लागली होती.

वाणगाव : डहाणू तालुक्याची समुद्रकिनारपट्टी आणि पूर्व भागातील एकूण २९ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू केलेली वाडा-पोखरण पाणीपुरवठा योजना ३० वर्षांनंतर देखील अपूर्णच असल्याने या भागातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारमुळे सुरवातीपासूनच या योजनेची रखडपट्टी सुरू आहे. वाणगाव पश्चिमेकडील गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी नादुरुस्त झाल्याने गळती लागली होती.त्याचप्रमाणे पाणी साठवणूक करण्यासाठी गावागावांत बांधलेल्या जलकुंभांची कामे देखील अपूर्णावस्थेत होती.ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २०१८ साली या योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन या वाढीव योजनेला ५० कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला व शिल्लक अपूर्ण कामे आणि दुरुस्तीला सुरूवात करण्यात आली होती.यामध्ये पूर्वेकडील गावांमध्ये नवीन जलकुंभ बांधून नवीन जलवाहिन्या टाकणे, गोवणे येथे नवीन ५ द.ल.लीटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र,अपूर्ण जलकुंभांची कामे पूर्ण करणे, गळती होत असलेल्या जलवाहिन्यांच्या जागी नवीन जलवाहीन्यांसारख्या कामांचा समावेश होता. परंतु या कामात ठेकेदाराने अतिशय निकृष्ठ आणि बोगस कामे केल्याने योजनेतील अनेक कामे अजूनही अपूर्ण राहिल्याचा आरोप होत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बाडा पोखरण पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसल्याने जुलै महिन्यापासून गोवणे येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणीपुरवठा देखील बंद केला असून सध्या जुन्याच केंद्रातून पाणी पुरवठा केला जात आहे.योजनेवर आत्तापर्यंत करोडो रूपयांचा निधी खर्च करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.तसेच मर्जीतील ठेकेदारावर असलेल्या राजकीय वरदहस्ताने बोगस व निकृष्ठ कामे झाल्याने या भागातील महिलांवर मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

पूर्वेकडील गावांचा पाणीपुरवठा बंद असून वाणगाव रेल्वे फाटकाजवळ नवीन जलवाहिनीच्या जोडणीचे काम बाकी असल्याने ऐन पावसाळ्यात वाणगाव,चिंचणी आणि तारापूर या मोठ्या गावांसोबत रेल्वेच्या पश्चिमेकडील योजनेच्या शेवटच्या गावातील नागरिकांना आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवस पाणी मिळत असून ते देखील पुरेशा दाबाने येत नसल्याने २९ गावातील जवळपास २ लाख नागरिकांवर नाईलाजाने विहिरी,बोरवेलचे खारट आणि मचूळ तसेच पावसाचे पाणी उकळून पिण्याची वेळ आली आहे.तर योजनेच्या शेवटच्या भागातील धाकटी डहाणू,गुंगवाडा,तडीयाळे,धुमकेत-अब्राम या गावात तर पाणीच जात नसल्याने ऐन पावसाळ्यात या भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागत आहे.

या गावांचा समावेश

- Advertisement -

डहाणू तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावे ही समुद्र आणि खाडी क्षेत्राच्या जवळ असल्यामुळे बहुतांश गावातील विहिरी आणि बोअरवेलला पिण्यासाठी अयोग्य असे खारट आणि मचूळ पाणी लागते.त्यामुळे तालुक्याच्या या भागातीलवाणगाव,चिंचणी,तारापूर,आसनगाव,केतखाडी,मोगरबाव,बावडा,देदाळे,कोलवली,कोटीम,तणाशी,चंडीगाव,वरोर,वासàाव,माटगाव,ओसारवाडी,वाढवण,बाडापोखरण,गुंगवाडा,तडीयाले,धुमकेत,धाकटी डहाणू सारख्या गावांना नळाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १९९२ साली बाडा- पोखरण पाणी पुरवठा योजनेची सुरवात करण्यात आली.त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात या योजनेत पूर्व भागातील साखरे,गोवणे,कापसी,दाभले,वीरे,वणई,खंबाळे,चंद्र्नगर आणि वाणगाव पूर्व या ९ गावांचा देखील समावेश करण्यात आला.

०००

वाणगाव परिसरातील २९ गावांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली वाडा पोखरण पाणी पुरवठा योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराचे निकृष्ठ काम यामुळे सुरवातीपासूनच अपयशी ठरली आहे.कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करून देखील नागरिकांना आवश्यक पुरेसे पाणी मिळत नाही त्यामुळे या योजनेचे संपूर्ण ऑडीट करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी.

… जयेंद्र दुबळा, जि.प.सदस्य,पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -