घर पालघर हा पूल इथे का ? नागरिक बुचकळ्यात

हा पूल इथे का ? नागरिक बुचकळ्यात

Subscribe

नाबार्ड या राष्ट्रीय विकासक बँकेच्या माध्यमातून नवीन पुलाच्या बांधकामासाठी ठेकेदाराने निधी मंजूर करुन जुन्या पुलाच्या बाजुलाच नवीन पुलाचे बांधकाम हाती घेतलेले आहे.

मोखाडा : तालुक्यापासून साधारणतः सहा ते सात किलोमीटर अंतरावरील सातुर्ली, वाशाळा या ग्रामपंचायतमधील गाव पाड्यांची लोकसंख्या चार साडेचार हजारांच्या जवळपास असून या गाव पाड्यातील नागरिकांना तालुक्याला येण्यासाठी मोखाडा- वाशाळा रस्त्यावरील सातुर्ली गावा नजीकच्या नदीवर मागील वर्षी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सुसज्ज नवीन पुलाचे बांधकाम केले आहे.असे असतानाही ठेकेदाराने त्याच पुलांच्या बाजुला नवीन पुलाचे बांधकाम सुरु केले आहे.
नाबार्ड या राष्ट्रीय विकासक बँकेच्या माध्यमातून नवीन पुलाच्या बांधकामासाठी ठेकेदाराने निधी मंजूर करुन जुन्या पुलाच्या बाजुलाच नवीन पुलाचे बांधकाम हाती घेतलेले आहे.

त्यामुळे केवळ निधी मंजूर होतोय म्हणून त्याचा विनियोग इतर विकास कामासाठी न करता एकाच ठिकाणी पुलाचे बांधकाम मंजूर करुन तेथेच लाखो रुपयांची खर्च का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नवीन पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता कशी काय मिळाली? ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगी घेतली का? नवीन कामांचे अंदाजपत्रक बनवताना सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी असे कोणतेही काम तेथे झाले नसल्याची खातरजमा का केली नाही ?असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत…

- Advertisement -

गरज इथे आहे
तालुक्यातील मुकुंदपाडा, कोल्हेधव, थाळेकरवाडी, यांसारखे इतरही गाव पाडे आहेत. ज्या गाव पाड्यातील नागरिकांना तालुक्याला येण्या जाण्या साठी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन नदीतील पाण्याच्या प्रवाहातून वाट काढावी लागते. त्यामुळे खरेच ज्या गाव पाड्यातील नागरिकांना ये जा करण्यासाठी नदीवर पूल नाही, अशा गाव पाड्यांच्या ठिकाणी नवीन पूल बांधकाम करणे गरजेचे आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -