घरपालघरगोवंशाच्या कत्तलीप्रकरणी महिलेला अटक

गोवंशाच्या कत्तलीप्रकरणी महिलेला अटक

Subscribe

पोलिसांच्या सूचनेनुसार मनोरच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी गोमांसाचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जप्त केलेले गोमांस जमिनीत पुरुन नष्ट करण्यात आले आहे.

मनोर: मनोर ग्रामपंचायत हद्दीतील ख्वाजा नगर डोंगरी (तेली पाडा) भागात गोवंशाची कत्तल केल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती.बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मनोर पोलिसांनी धाड टाकली असता गोवंशाची कत्तल आणि विक्रीच्या उद्देशाने तुकडे करण्यासाठी मदत करणारी आरोपीची पत्नी अफसाना पठाण हिला पोलिसांनी अटक केली असून दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९, ४२८,४२९, ३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५,५(क), १, ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच आरोपी मजहर शेख देखील त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील पडवीत चोरीने आणलेल्या बेकायदेशीर रित्या गोवंशाची कत्तल करून लोखंडी सुर्‍याने तुकडे करीत असल्याचे आढळून आला.पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी मजहर पठाण आणि इतर दोन जण घटनास्थळावरून पळून गेले.कारवाई दरम्यान घटनास्थळा वरून 371 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार मनोरच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी गोमांसाचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जप्त केलेले गोमांस जमिनीत पुरुन नष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -