घरसंसदीय अधिवेशन 2022... मग कशावर चर्चा करणार; चीनच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक

… मग कशावर चर्चा करणार; चीनच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक

Subscribe

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. भारत व चिनी सैन्यामध्ये चकमक झाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात धुमचक्री होत आहे. काँग्रेसने सोमवारी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. तशी नोटीसही दिली. मात्र भाजपने ही मागणी फेटाळली. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने भाजप सरकारला धारेवर धरत सभात्याग केला.

नवी दिल्लीः चीनच्या घुसखोरीवर चर्चा नाही करणार तर आणखी कशावर चर्चा करणार असा सवाल करत काँग्रेसने सोमवारी राज्यसभेत सभा त्याग केला. चर्चा करण्याची नोटीस भाजप सरकारने फेटाळल्याने काँग्रेस आक्रमक झाली.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. भारत व चिनी सैन्यामध्ये चकमक झाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात धुमचक्री होत आहे. काँग्रेसने सोमवारी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. तशी नोटीसही दिली. मात्र भाजपने ही मागणी फेटाळली. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने भाजप सरकारला धारेवर धरत सभात्याग केला.

- Advertisement -

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, चीनने भारताच्या दोन हजार चौ.मीटर भूभागाचा ताबा घेतला आहे. चीन भारतावर युद्ध करण्याच्या तयारीत आहे. भाजप सरकार हे झोपेत आहे. राहुल गांधी यांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, युपीएची सत्ता असताना अशा संवेदनशील मुद्द्यांवर कधीच चर्चा झाली नाही. आपले सैन्य सीमेवर खंबीरपणे उभे आहे. राहुल गांधी असे वक्तव्य करुन सैन्याचे खच्चीकरण करत आहेत. काँग्रेस पक्ष या मुद्द्याचे राजकारण करत आहे.

चीनच्या कथित बांधकामावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी संसेद नोटीस दिली होती. ती नोटीस फेटाळ्यात आली. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते मलि्लकार्जुन खरगे यांनी चीनच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. चीनच्या घुसखोरीवर चर्चा नाही करणार तर आणखी कशावर चर्चा करणार असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेचे खापर काँग्रेसवर फोडले. राजीव गांघी ट्रस्टला चिनकडून पैसे मिळत होते. त्यामुळे चीनची मुजोरी वाढली, असा आरोप मंत्री शाह यांनी केला. त्यावर काँग्रेसनेही पलटवार केला.

या आरोपप्रत्यारोपात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी एक फोटो ट्विट केला. या फोटोत ते तवांग सेक्टरमध्ये दिसत आहेत. तेथे त्यांनी सैनिकांची भेट घेतली, असे दृश्य आहे. देशाची सीमा सुरक्षित आहे, असे मंत्री रिजिजू यांनी या फोटोसोबत ट्विट केले होते. मात्र हा फोटो तीन वर्षापूर्वीचा आहे. तस्वीर वही, दावा वही, बस साल बदल गया, २०१९ की तस्वीर का इस्तमाल कर २०२२ में सीमाओं की सुरक्षा का भरोसा दिलाया जा रहा है। गजब फर्जीवाड़ा है…, अशी खोचक टीका युवक काँग्रेस अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -