Photo : विधानभवनाच्या पाऱ्यांवर विरोधकांची चूल

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील चौथा दिवस आहे. अधिवेधनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या प्रश्नांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यावरून विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर करत असलेले हे अनोखे आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे. आज विरोधकांनी चक्क विधानसभेच्या पायऱ्यांवरच चूल मांडली. गॅस दरवाढ आणि वाढती महागाई या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले.