नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या कांतारा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. या चित्रपटात कथा लोक कथेवरील आधारित असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कांतारा चित्रपटा आधी देखील बऱ्याच चित्रपटांमध्ये अशाचप्रकारच्या लोककथेवरील आधारित कथा मांडण्यात आली होती.
तुम्बाड :
2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तुम्बाड’ या मराठी चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील एका गावाची कथा मांडण्यात आली आहे.
रावण :
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रावण’ चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते. यातील कथा देखील लोककथेवर आधारित होती.
स्त्री :
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री’ चित्रपटामधील कथा देखील लोककथेवर आधारित आहे.
बुलबुल :
अनुष्का शर्माच्या प्रोडक्शनमध्ये तयार झालेला ‘बुलबुल’ चित्रपट देखील लोककथेवर आधारित होता.
पहेली :
शाहरुख आणि राणी मुखर्जीच्या या चित्रपटामधील कथा देखील लोककथेवर आधारित होती.