Dussehra 2021 : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा फुलल्या

Dussehra 2021 Flower Market Crowded For Shopping On Eve Of Dussehra
Dussehra 2021 : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा फुलल्या

साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा हा सण मानला जातो. यंदा १५ ऑक्टोबर रोजी देशभरात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळणार आहे. या दसऱ्याच्या मुहूर्तानिमित्त ग्राहकांची विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबईतील प्रसिद्ध दादर फुल मार्केटमध्येही सर्वत्र खरेदीचे वातावरण आहे. बाजरपेठांमध्ये झेंडूच्या फुलांची आवकही  वाढलेली पाहायला मिळतेय.  त्यामुळे बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी बहरलेलं चित्र आज सर्वत्र पाहायला मिळालं.