Drugs Case: अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला

Drugs Case Special NDPS Court rejects bail plea of Armaan Kohli
Drugs Case: अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या तपासा दरम्यान बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड चर्चेत आले. एनसीबीने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या घरी छापेमारी करून ड्रग्ज जप्त केले. तसेच काही कलाकारांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. सध्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चर्चा सुरू आहे. अटकेत असलेल्या आर्यनचा जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र त्याच्या पदरी निराशा पडत आहे. आजही आर्यन खानच्या जामीन अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. एकीकडे क्रूझ ड्रग्ज प्रकरण सुरू असताना दुसरीकडे अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज स्पेशन एनडीपीएस कोर्टाने फेटाळला आहे. ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहली याला एनसीबीने अटक केली होती. (Special NDPS Court rejects bail plea of Armaan Kohli )

या ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहलीसोबत इतर दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. काही दिवसांपासून अभिनेता अरमान कोहलीला एनसीबीने अटक केली होती. एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अरमानच्या मुंबईत असलेल्या घरात ड्रग्ज सापडल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या एका कोर्टाने अरमान कोहलीला न्यायालयीन कोठडीत पाठवले.

दरम्यान अरमान व्यतिरिक्त ड्रग्ज व्रिकीच्या आरोपात अजय सिंहला हाजीअली भागातून अटक करण्यात आली होती. एनसीबीने अजय हिस्ट्री शीटर असल्याचे सांगितले आहे. त्याच्या चौकशीदरम्यान अरमान कोहलीचे नाव समोर आले होते. ज्यानंतर अरमानच्या घरावर धाड टाकून अटक केली होती.


हेही वाचा – याप्रकरणी समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार