घरफोटोगॅलरीपुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अग्नितांडव! बघा भीषण आगीचे फोटो

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अग्नितांडव! बघा भीषण आगीचे फोटो

Subscribe

पुण्याच्या मांजरी परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे समोर आले आहे. आगीच्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असून कोरोनावरील लसीची निर्मिती याठिकाणी मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -