Photo : ग्लोबल आयकॉन दीपिका पादुकोणचा ऑस्करमधील लूक चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ग्लोबल आयकॉन म्हणून देखील ओळखली जाते. तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. नुकतीच दीपिकाने 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. दीपिका पादुकोण तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा हा लूक प्रचंड व्हायरल होत आहे.