Diwali shopping : दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग ; बाजारपेठा सजल्या

अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. देशभरात दिवाळी म्हणजे दीपावली हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा होतो. यंदाही २ नोव्हेंबरपासून देशात दीपोत्सवाला प्रारंभ होईल.दिवाळी सणासाठी अनेक बाजारपेठा सजल्या आहेत.दिवाळी म्हटलं की,घराची सजावट आलीच.यासाठी बाजारपेठा सजल्या असून, ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.  मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये गर्दी, सजावटीचे साहित्य जसे की कृत्रिम फुले, लाइटिंग आणि इतर सजावटीचे साहित्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. (छाया : दिपक साळवी) 

 


हे ही वाचा – Diwali 2021 : दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्व; धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशीमागील परंपरा