राजकीय भूकंपानंतर शिवसेना भवनाबाहेर आज शुकशुकाट 

राज्यातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दरम्यान सरकार अस्थिर असल्याचे थेट संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले. राऊतांनी केलेल्या एका ट्विटमुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटातही विविध चर्चांना उधाण आहे.  राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असे ट्विट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं होत. मात्र मुख्यमंत्र्यांकडून विधानसभा बरखास्त होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग वाढत असला तरी दुसरीकडे दादरच्या शिवसेना भवनासमोर आज सकाळपासून शुकशुकाट असल्याचं चित्र आहे. (फोटो- अरुण पाटील)