Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo : पंतप्रधान मोदींनी केली नव्या संसद भवनाची अचानक पाहाणी...

Photo : पंतप्रधान मोदींनी केली नव्या संसद भवनाची अचानक पाहाणी…

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नव्या संसद भवनाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी या संसद भवनाची पाहाणी करतानाच तिथे सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांशी संवादही साधला. पंतप्रधान मोदी यांनी एक तासाहून अधिक काळ या नव्या संसद भवनातील दोन्ही सभागृहांची पाहाणी केली.

- Advertisement -

 

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत देशाची राजधानी नवी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी एका कार्यक्रमात या नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती. आता या संसद भवनाचे काम पाहण्यासाठी पंतप्रधान गुरुवारी आले होते.

- Advertisement -

केंद्र सरकारने 2019 मध्ये सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये नवी दिल्लीतील इतर प्रकल्पांसह संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा समावेश आहे.

 

देशाच्या या नव्या संसद भवनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अचानक भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांकडून या संसद भवनाची बारीकसारीक माहिती जाणून घेतली.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारी संसद पूर्णपणे नव्या रुपात दिसत आहे. संसदेची ही नवीन इमारत अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. दोन्ही सभागृहांमधील उपलब्ध सुविधांची माहिती देखील पंतप्रधानांनी घेतली.


या भव्य वास्तूची उभारणी करणाऱ्या कामगारांची दखल पंतप्रधान मोदींनी घेतली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कामगारांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.


संसदेच्या नवीन इमारतीच्या पाहणीच्या वेळी पंतप्रधान मोदींसोबत लोकसभेचे सभापती ओम बिर्लाही उपस्थित होते.

- Advertisment -