भारतीय नौदलाच्या जवानांबरोबर सलमान खानने तिरंगा फडकवला

भारतामध्ये सर्वात मोठ्या डिस्ट्रॉयर आईएनएस विशाखापट्टनम वर सुद्धा आज आजादीचा महापर्व साजरा केला जात आहे. या उत्सवामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सहभाग घेतला आहे. सलमान खानने बोटीवर तिरंगा फडकावला. तसेच राष्ट्रगीत गायले त्यानंतर नेवीच्या जवानांसोबत खूप मजामस्ती केली. यावेळी सलमानने नौदलाच्या जवानांबरोबर हँड पुश अप्स देखील मारल्या तसेच नौदलाच्या जवानांचं मन जिंकून घेतलं.