Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'बस बाई बस'च्या मंचावर पंकजा मुंडेंचा खेळकर अंदाज

‘बस बाई बस’च्या मंचावर पंकजा मुंडेंचा खेळकर अंदाज

Subscribe

काही दिवसांपूर्वी आलेला नवा कोरा कार्यक्रम ‘बस बाई बस’(bus bai bus) याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. महिला वर्गासाठी हा कार्यक्रम प्रामुख्याने सुरु करण्यात आला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे(subodh bhave) या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात महिलांची ही राखीव बस एका स्पेशल व्यक्तींसाठी थांबली आहे. बस बाई बस कार्यक्रमाचा नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे(pankaja munde) खेळकर अंदाजात दिसल्या.

हे ही वाचा – ‘तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरी मागता का?’; सुबोध भावेचा आगळावेगळा प्रश्न

- Advertisement -

बस बाई बस कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला या कार्यक्रमाच्या आगामी भागात पंकजा मुंडे विशेष पाहुण्या म्हणून उपस्थिती लावणार असल्याचं दिसत आहे. या कार्यक्रमात सुबोध भावे पंकजा मुंनडेंना भन्नाट प्रश्न विचारताना दिसणारा आहे. आणि पंकजा मुंडे(pankaja munde) सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरे खेळकर पद्धतीने देताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये सुबोध भावेने पंकजा मुंनडेंना एक राजकारणाशी संबंधी एक प्रश्न विचारला ‘तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडले आहेत का’? सुबोध भावेच्या या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी मजेशीर आणि खेळकर उत्तर दिले आहे. ‘एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू’ असं भन्नाट उत्तर पंकजा मुंनडेंनी सुबोध भावेच्या प्रश्नावर दिले आहे. पंकजा मुंडेंनी दिलेल्या उत्तरावर प्रेक्षकांनी सुद्धा मनमुराद प्रतिसाद दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

 

हे ही वाचा – ‘आसामला नेणार का?’ अमृता फडणवीसांच्या या प्रश्नाने वेधले सर्वांचे लक्ष; भर कार्यक्रमात पिकला हशा

पंकजा मुंडेंची(pankaja munde) उपस्थिती असलेला हा भाग १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे या भागात आणखी काय मजेशीर गोष्टी पाहायला मिळणार आहेत त्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीने हा भाग आणखीच रंगतदार होणार आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना पुढच्या भागाची सुद्धा उत्सुकता आहे. पंकजा मुंडे कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यावर मनमोकळा संवाद साधतात.

हे ही वाचा – ‘बस बाई बस’मध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत सुप्रिया सुळेंनी दिलं मजेशीर उत्तर

 

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -